भीम आर्मी राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे नगर जिल्हा दौ-यावर..


भीम आर्मी राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे नगर जिल्हा दौ-यावर..

शिर्डी राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे हे दि.26 फेब्रुवारी( शुक्रवार ) रोजी अहमदनगर जिल्हा दौ-यावर येणार असुन त्याच्यासमवेत कार्याध्यक्ष सुनिल गायकवाड, मुख्य संघटक दिपक भालेराव हे येणार असल्याची माहिती भीम आर्मीचे नगर( द.)प्रमुख व नगर (उ)चे प्रभारी तानसेन बिवाल यांनी दिली आहे. 

जिल्ह्यातील राहूरी, कोपरगांव, राहता ,नेवासे आदी.भागात त्यांच्या हस्ते व कार्याध्यक्ष सुनिल गायकवाड यांचे हस्ते दिपक भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेच्या शाखा नामफलकांचे उदघाटन होणार आहे.तसेच भीम आर्मी मजबूत करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील  गावोगावी, खेडोपाडी चंद्रशेखर आझाद रावण यांचे विचार पेरून गोरगरिबांच्या मदतीसाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा प्रमुख तानसेन बिवाल म्हणाले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News