सचिन पोटरे यांनी घराच्या सातशे स्केअर फुट टेरेस वर फुलवली बाग व शेती


सचिन पोटरे यांनी घराच्या सातशे स्केअर फुट टेरेस वर फुलवली बाग व शेती

कर्जत प्रतिनिधी मोतीराम शिंदे :

कर्जत -नगरपंचायतने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मधे भाग घेतला असून भारतीय जनता पक्षाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे आणि त्यांच्या पत्नी सौ. सुवर्णा पोटरे यांनी माझा कचरा माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत घरातील ओला कचरा व सुका कचरा यावर फुलवली तीनशे झाडांची बाग ७०० स्क्वेर फुट टेरेसच्या एरिया वर तीनशे झाडांची  बाग लाऊन घरातील रोजचा ओला कचरा व सुका कचरा यावर प्रक्रिया करून त्याचं कंपोस्ट खत तयार करून या सर्व झाडांना व रोपांना या सेंद्रिय खतांमुळे चांगली व पौष्टिकता मिळून झाडांची चांगली वाढ होऊन रोज सेंन्द्रिय फळे व भाज्या खायला मिळत आहेत. रोज रासायनिक खतांचा वापर करून आपण खात असलेल्या भाज्या व फळ यापासून थोडीफार का होईना सुटका मिळत असून या टेरेस गार्डनवर अनेक फळांची झाडे असुन यात आंबा, चिकू, सिताफळ, संत्रा, मोसंबी, लिंबू, पेरू, अंजीर, इत्यादी फळांच्या झाडांची लागवड असून भाज्यांमध्ये कारले, आळूची पाने, मेथी, शेपू, पालक, वांगी, टमाटे, काकडी, हादग्याची फुले, वाल, तांदूळसा, चिघळ, इत्यादी भाज्या असुन यामधे दुर्मिळ व औषधी अशी पाथरी ची भाजी, तसेच औषधी वनस्पती मध्ये कृष्ण तुळस , रान तुळस ,गवती चहा पुदिना , पानफुटी , शोभेच्या झाडांमध्ये विविध रंगीबेरंगी गुलाब , रानचाफा , सोनचाफा,मोगरा ,इत्यादी तसेच सर्व प्रकारच्या रेनलिली, विविध प्रकारचे जास्वंद ,शेवंती , चिनी रातराणी ,तागडा ,निशिगंध  गुलाब ,गोकर्ण ,सदाफुली , कागदी फुले विविध फुलांची झाडे व रोपे आहेत. यामध्ये पिंपळ ,कडुनिंब ,व इतर फळांच्या झाडांवर बोन्साय चा प्रयोग चालू असून विविध ऋतूंमध्ये ही फळे खायला मिळत आहेत असे पोटरे यांनी सांगितले . या टेरेस वरच्या बागेत रोज अनेक प्रकारचे पक्षी येत असून या पक्षांना पाणी आणि धान्य खाण्यासाठी ठेवल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाऊन उन्हाळ्यात पक्ष्यांना पाण्याची सोय होत आहे. तसेच याच गार्डनमध्ये मधमाशांचे पोळ तयार झाले असून या मधमाशांचा मुळे नैसर्गिकरित्या परागीकरण होऊन फुलांची संख्या ही वाढत आहे.

पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी व आपला घरातील  कचरा घरातच त्याच्यावर प्रक्रिया करून आपले शहर स्वच्छ ,सुंदर व हरित कर्जत होण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने आपल्या दारात किंवा टेरेस वर अशा प्रकारचे गार्डन तयार करून माझा कचरा..माझी जबाबदारी  या मोहिमेत कर्जत शहराला स्वछता अभियानात अव्वल स्थान मिळण्यासाठी आपलं योगदान द्यावे - सौ.सुवर्णा सचिन पोटरे 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News