दौंड ग्रामीण भागात एका दिवसात 16 तर शहरात 5 रुग्ण,3 दिवसात 33 कोरोना रुग्ण,17 वर्षाची मुलगी कोरोनाग्रस्त


दौंड ग्रामीण भागात एका दिवसात 16 तर शहरात 5 रुग्ण,3 दिवसात 33 कोरोना रुग्ण,17 वर्षाची मुलगी कोरोनाग्रस्त

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात एका दिवसात तब्बल 16 रुग्ण सापडले आहेत तर शहरी भागात पाच रुग्णांची वाढ झाली आहे, तर तीन दिवसांमध्ये तब्बल 33 कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत, नानवेज किडगाव पिंपळगाव या ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण सापडला असून खडकी येथे 5 तर खानोटा येथे 3 रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी सौ सुरेखा पोळ यांनी दिली आहे, दौंड उपजिल्हा रुग्णालय येथे अँटी जण तपासणीमध्ये शहरांमध्ये पाच ग्रामीण भागामध्ये पाच असे दहा रुग्ण सापडले आहेत, यामध्ये पाच महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे, किशोर रुग्ण 17 ते 55 वयोगटातील आहेत, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर संग्राम डांगे यांनी दिली आहे,  33 जणांचे rt-pcr घेतले आहेत त्यांचे रिपोर्ट उद्या मिळतील अशी माहिती डॉक्टर मिलिंद कांबळे यांनी दिली, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे जनतेने काळजी घेणे गरजेचे आहे, आज  शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये एकवीस रुग्ण सापडल्यामुळे कोरोनाची व्याप्ती वाढत चालली आहे हे लक्षात येते,तरी जनतेने बेफिकिरी न दाखवता शासनाचे नियमांचे काटेकोरपणे पालन करून स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे डॉक्टर सुरेखा पोळ यांनी सांगितले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News