आमदार मोनिका राजळे यांच्या सूचनेनंतर बक्तरपूर, मजलेशहर चा वीजपुरवठा सुरळीत


आमदार मोनिका राजळे यांच्या सूचनेनंतर बक्तरपूर, मजलेशहर चा वीजपुरवठा सुरळीत

शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव फाटा येथे आमदार मोनिका राजळे यांच्या शी चर्चा करताना बक्तरपूर, मजलेशहर येथील शेतकरी.

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

शेवगाव तालुक्यातील अंत्रे सबस्टेशन अंतर्गत बक्तरपुर, मजलेशहर येथील थकीत विज बिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने शेतीची वीजपुरवठा बंद केला होता. आमदार मोनिका राजळे शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथील एका खाजगी कार्यक्रमासाठी आल्या असता बक्तरपुर, मजलेशहर येथील शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विनंती केली. आमदार मोनिका राजळे यांनी तातडीने वीज मंडळाच्या वरिष्ठ अधिकारी संपर्क साधत वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार काल बुधवार दिनांक 24 रोजी वीज पुरवठा सुरळीत करण्यात आल्याची माहिती शेवगाव तालुक्यातील येथील सामाजिक कार्यकर्ते विलास फाटके यांनी दिली.

वीज पुरवठा खंडित केल्यास आंदोलन - फाटके

आमदार मोनिका राजळे यांनी बक्तरपूर, मजलेशहर येथील शेतकऱ्यांची विज प्रश्नासंदर्भात समस्या जाणून घेत. वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. पुन्हा वीज मंडळाने वीज खंडीत केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा विलास फाटके यांच्या सह शेतकऱ्यांनी दिला.



जाहिरात
Search
विडिओ
Recent News