अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने तनपुरे महाराजांचा सत्कार


अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने तनपुरे महाराजांचा सत्कार

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण:

 वारकरी संप्रदायातील एक महान व्यक्तिमत्व राष्ट्रीय संत ह-भ-प श्री. बद्रीनाथ महाराज तनपुरे  यांना महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार जाहीर झाला . त्याबद्दल अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला . वारकरी संप्रदायाची व गोरगरिबांची सेवा मोठे तनपुरे बाबानी केली . तोच वारसा  बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी .माझ्या वडिलांची मिराशी गा देवा  तुझी चरण सेवा साधावया   तुकाराम महाराज यांच्या उक्ती प्रमाणे जीवनभर जपला , तसेच हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत अनेक लोकांना चारधाम तीर्थयात्रा घडवली अनेक तीर्थस्थानाचे ठिकाणी भाविकासाठी मठ उभारण्याच काम केलं . ७२ च्या दुष्काळात मोठे तनपुरे बाबा यांनी मोठा यज्ञ केला . त्याचे फळ म्हणून आणि पूर्वजांच्या पुण्याईमुळे मला हा पुरस्कार जाहीर झाला असं सत्कार प्रसंगी तनपुरे महाराज म्हणाले . आत्तापर्यंत जीवनात नैसर्गिक संकटात बरोबर आरोग्याच्या बाबतीतही अनेक संकटे आली परंतु पांडुरंगाच्या कृपेमुळेच त्याचे निवारण झाले असे सत्काराच्या वेळी तनपुरे बाबा म्हणाले . सत्कार प्रसंगी महाराष्ट्र राज्य अ भा वा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष ह भ प श्री अनिल महाराज वाळके , संत संमेलन प्रमुख ह-भ-प श्री अतुल महाराज आदमाने , अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष ह-भ-प श्री राम महाराज उदागे , सहजिल्हाध्यक्ष महादेव महाराज शिरसाट गोपालन समितीचे सदस्य अर्जुन महाराज कंठाळी यांच्या वतीने महाराजांचा सत्कार करण्यात आला . तनपुरे महाराजांना सरकारचा हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे ‌.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News