दौंड मध्ये निरंकारी बाबा हरदेवसिंहजी यांच्या जन्मदिनी संत निरंकारी मिशनकडून वृक्षारोपण व वृक्ष संरक्षण अभियान


दौंड मध्ये निरंकारी बाबा हरदेवसिंहजी यांच्या जन्मदिनी संत निरंकारी मिशनकडून वृक्षारोपण व वृक्ष संरक्षण अभियान

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी - :

शांतीपूर्ण सह-अस्तित्वाची भावना जागृत करुन जगामध्ये मानव एकता, विश्वबंधुत्व आणि शांतीसुखाने युक्त वातावरण निर्माण करण्यासाठी आपले पूर्ण जीवन समर्पित करणारे निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या ६७व्या जन्मदिनी संत निरंकारी मिशनतर्फे देश-विदेशात वृक्षारोपण व वृक्ष संरक्षण अभियान राबविण्यात येत आहे. बाबा हरदेवसिंहजी यांच्या जन्मदिनानिमित्त जगभर राबविण्यात येत असलेल्या वृक्षारोपण व वृक्ष संरक्षण अभियाना अंतर्गत २१ ते २३ फेब्रुवारी, २०२१ दरम्यान प्रत्येक निरंकारी परिवाराने कमीत कमी एक रोप लावावे व त्याचे तीन वर्षापर्यंत संगोपन व संरक्षण करावे अशी प्रेरणा देण्यात आलेली आहे. 

दौंड तहसीलदार ऑफिस परिसरामध्ये कोरोनाविषयीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत  हे अभियान राबविण्यात आले असून त्यामध्ये विविध जातींच्या रोपांची लागवड करण्यात आली व त्यांच्या संगोपनाची शपथ घेण्यात आली.

यावेळी दौंड चे तहसिलदार श्री संजय पाटील, निरंकारी मंडळाचे श्री अवनित तावरे , श्री शिवाजी होले आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News