कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता शहरात रविवारी जनता कर्फ्यूची गरज !


कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता  शहरात रविवारी जनता कर्फ्यूची गरज !

शिर्डी राजेंद्र दूनबळे  प्रतिनिधी

श्रीरामपूर

सध्या राज्यात कोरोना (कोविड १९) मोठ्या प्रमाणात फोपावत असताना मु़ंबई पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यात प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहे,मा.जिल्हाधिकारी यांच्या नव्या आदेशान्वये अहमदनगर जिल्ह्यात आजपासून रात्री १० ते सकाळी ५ या दरम्यान संचारबंदी राहणार आहे, १४४ या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे,रात्री १० नंतर जर कोणी बाहेर फिरताना आढळला तर पोलिसांकरवी त्याला प्रसादही मिळू शकणार आहे, कारण कोरोना रुग्ण संख्या ही झपाट्याने वाढत असली तरी योग्य  खबरदारीने त्यावर अंकूश मिळविणे शक्य आहे,आणि योग्य खबरदारी न घेतली गेल्यास लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते ?, याकरीता शहरात सर्वांनी संवयस्फूर्तीने जनता कर्फ्यूसारखा निर्णय घेण्याची शहराला नितांत गरज आहे, 

जर सर्वांनी स्वंयस्फूर्तीने दर रविवारी जनता कर्फ्यू पाळला तर वाढत्या कोरोना प्रादुर्भावावर मोठ्या प्रमाणात आळा बसू शकेल,शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन केल्यास लॉकडाऊन सारखी परिस्थिती उद्भवणार नाही,म्हणून शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन तथा आठवड्यातून किमान एक दिवसाचा रविवारी जनता कर्फ्यू ही काळाची गरज ठरत असल्याचे जे.जे.फाऊंडेशनचे अध्यक्ष जोएफ जमादार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News