काय म्हणाले मुख्यमंत्री "लाईव्ह" च्या माध्यमातून? जाणून घ्या कोरोना अपडेट्सच्या माध्यमातून


काय म्हणाले मुख्यमंत्री "लाईव्ह" च्या माध्यमातून? जाणून घ्या कोरोना अपडेट्सच्या माध्यमातून

कोरोनाचा विळखा हळू हळू घट्ट होत असताना, सामान्य जनतेच्या मनात असलेल्या लॉकडाऊन होणार कि नाही या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी तसेच इतर मार्गदर्शन करण्यासाठी आज सायंकाळी 7 वाजता लाईव्ह आले.

या लाइव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्री खालील गोष्टीवर बोलले

लाखाच्या आसपास फ्रंटलाईन वर्कर्सला लसीकरण पूर्ण आणखी 1 ते 2 कंपन्या लस उपलब्ध करून देणार, त्यानंतरच सर्वसामान्य जनतेला लस उपलब्ध होणार कोरोना व्हायरस विरुद्ध युद्ध जिंकायचं असलं तर मास्कला "ढाल" म्हणून वापरणं गरजेचं राज्यात कोरोना परत डोकं वर काढतोय, कोरोनाला हलक्यात घेऊ नका; नियम पाळा.संसर्गाची साखळी तोडायची असल्यास, संपर्क टाळा पाश्चिमात्य देशांमध्येही लॉकडाऊनची वेळ आलीय.नियम मोडल्यास हॉल आणि हॉटेलचालकावर कारवाई होणार नियम मोडून शाहिद कोविड योध्यांचा अपमान करू नका "कोरोना योद्धे" होऊ शकला नाहीत तर "कोविड दूत" तरी होऊ नका

कोरोनाची दुसरी लाट आलीकी नाही माहिती नाही, पण ते येणारे 15 दिवस ठरवतील अमरावती, अकोला जिल्यातील परिस्थिती चिंताजनक! गरज असल्यास कडक निर्बंध लढा, मुख्यमंत्र्यांचे सर्व अधिकाऱ्यांना आदेश राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी

"मी जबाबदार, मास्क लावा, शिस्त पाळा; लॉकडाऊन टाळा.!" सरकारची नवी घोषणा

ऑफिसच्या वेळेचं विभाजन करा, वर्क फ्रॉम होम वर भर द्या.

लॉकडाऊन होणार किंवा नाही?

यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कि जर तुम्ही कोरोनाचे नियम पाळले, मास्क वापरला, सानेटायझर वापरले, सामाजिक अंतर पाळले तर पुढील आठ दिवस ठरवतील कि लॉकडाऊन होणार कि नाही. म्हणजेच आता लॉकडाऊन हा लोकांनी कोरोना नियम पाळण्यानुसार घेतला जाईल असं म्हटलं आहे. थोडक्यात बघू आणि ठरवू असा पवित्रा लॉकडाऊन विषयी मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतला आहे.जाहिरात
Search
विडिओ
Recent News