जेसीबी मालक संघटनेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष पदी राजेश फटागंरे यांची सर्वानुमते निवड


जेसीबी मालक संघटनेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष पदी राजेश फटागंरे यांची सर्वानुमते निवड

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

शेेवगांव तालुका जेसीबी मालक संघटनेच्या अध्यक्षपदी पत्रकार बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष पदी राजेश फटागंरे, सचिव पदी अनिल मेरड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कडुबाळ घुले होते.

जेसीबी मालक संघटनेची बैठक नुकतीच शेवगाव- नेवासा राज्यमार्गावरील भातकुडगांव फाटा येथील बजरंग हाँटेल मध्ये पार पडली. दिवसेंदिवस डिझेल चे भाव वाढत असल्याने  जेसीबी मालक मेटाकुटीस आले आहेत. त्यातच तालुका महसूल प्रशासन विहीरीचे डबर, मुरुम उचलणा-या जेसीबी वर दंडात्मक कारवाई केली जात असल्याने जेसीबी मालक हैराण झाले आहेत. कारवाई च्या धास्तीने उद्योग धंदा करता येत नाही. जेसीबी वर काढलेल्या कर्जाचे हप्ते कसे फेडायचे असा प्रश्न जेसीबी मालकासमोर पडला आहे. तालुका महसूल प्रशासनाने विहीरीचे साहित्य वाहतुकीस परवानगी द्यावी. व डिझेल दरवाढीमुळे प्रती तास भाव करण्यासाठी विचारविनिमय करून या बैठकीत १ फेब्रुवारी पासुन भाव वाढ करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी कडुबाळ घुले यांनी पुढील प्रमाणे कार्यकारणी जाहीर केली.

अध्यक्षपदी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष  बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष पदी भातकुडगांव चे माजी सरपंच राजेश फटागंरे, सचिव पदी देवटाकळी येथील जय भवानी तरुण मंडळाचे अध्यक्ष अनिल मेरड, कार्याध्यक्ष पदी सागर खंडागळे, तर सदस्य पदी कडुबाळ घुले, विशाल गवारे, माऊली काळे, अन्सार शेख, सुनील आठरे, देविदास फाटके, दिपक जगदाळे, विशाल जाधव, संजय फाटके, रामजी शिदोरे, सचिन सातदिवे, भागवत आडकीत्ते, संतोष चेके यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.

यावेळी कानिफ सातदिवे, किरण आमले, सुनील ओहळे, पवन खंडागळे, शहादेव चापे, मयूर फाटके, महेश सामृत यांच्या सह जेसीबी मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार चंद्रशेखर घुले, जि.प.अध्यक्षा राजेश्रीताई घुले, प.स. सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी अभिनंदन केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News