कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ अध्यक्ष अरुण गाडे याच्यावर दोन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल


कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ अध्यक्ष अरुण गाडे याच्यावर दोन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

दौंड -अरुण गाडे याच्यावर दौंड पोलीस ठाण्यात बदनामीकारक व खोटा मजकूर व्हाट्सअपवर प्रसिद्ध करून प्रसारीत केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती  गौतम कांबळे यांनी दिली आहे,त्यांनी  कास्ट्राईब संघटनेच्या राज्यमहासचिव शिक्षक आघाडीच्या पदाचा व संघटनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा  राजीनामा दिला होता व अरुण गाडे याने तो राजीनामा मंजूर केल्याचे पत्राद्वारे कळविले होते ,राजीनामा मंजूर करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या .परंतु काही दिवसांनी  गौतम कांबळे राज्याध्यक्ष मूलनिवासी शिक्षक संघ यांच्याबद्दल व्हाट्सअपद्वारे खोटा व बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करून प्रसारीत केला . गौतम कांबळे यांच्या कार्यक्षेत्रातील  वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पीडीसीसी बॅकेचे शाखा अधिकारी यांना पत्र पाठवून संघटनेतून हकालपट्टी केल्याची खोटी व बदनामीकारक माहिती  प्रसारोत करून सर्व सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात बदनामी व मानहानी केली तसेच आर्थिक अफरातफर केल्याची खोटी माहितीही कोणताही पुरावा सादर न करता प्रसारीत केली .बँक अधिकाऱ्यांनाही सदर पत्र  दिले,अशी पत्रे वाॅट्सअपसारख्या सोशल माध्यमांद्वारे  पसरवून आणि  बदनामीकारक पत्रे थेट गौतम कांबळे यांना न पाठवता व्हाट्सअपवर पसरवून व ही पत्रे पसरविण्यासाठी काही तोतयांची, समाजकंटकांची मदत घेतल्याचे ही समजते यातून श्री गौतम कांबळे यांची बदनामी केली व  सामाजिक व शैक्षणिक कार्यक्षेत्रात बदनामी, मानहानी करून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जो मानसिक त्रास दिला त्याबद्दल  दौंड पोलिस ठाण्यात श्री अरुण गाडे अध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News