विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:
दौंड -अरुण गाडे याच्यावर दौंड पोलीस ठाण्यात बदनामीकारक व खोटा मजकूर व्हाट्सअपवर प्रसिद्ध करून प्रसारीत केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती गौतम कांबळे यांनी दिली आहे,त्यांनी कास्ट्राईब संघटनेच्या राज्यमहासचिव शिक्षक आघाडीच्या पदाचा व संघटनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता व अरुण गाडे याने तो राजीनामा मंजूर केल्याचे पत्राद्वारे कळविले होते ,राजीनामा मंजूर करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या .परंतु काही दिवसांनी गौतम कांबळे राज्याध्यक्ष मूलनिवासी शिक्षक संघ यांच्याबद्दल व्हाट्सअपद्वारे खोटा व बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करून प्रसारीत केला . गौतम कांबळे यांच्या कार्यक्षेत्रातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पीडीसीसी बॅकेचे शाखा अधिकारी यांना पत्र पाठवून संघटनेतून हकालपट्टी केल्याची खोटी व बदनामीकारक माहिती प्रसारोत करून सर्व सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात बदनामी व मानहानी केली तसेच आर्थिक अफरातफर केल्याची खोटी माहितीही कोणताही पुरावा सादर न करता प्रसारीत केली .बँक अधिकाऱ्यांनाही सदर पत्र दिले,अशी पत्रे वाॅट्सअपसारख्या सोशल माध्यमांद्वारे पसरवून आणि बदनामीकारक पत्रे थेट गौतम कांबळे यांना न पाठवता व्हाट्सअपवर पसरवून व ही पत्रे पसरविण्यासाठी काही तोतयांची, समाजकंटकांची मदत घेतल्याचे ही समजते यातून श्री गौतम कांबळे यांची बदनामी केली व सामाजिक व शैक्षणिक कार्यक्षेत्रात बदनामी, मानहानी करून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जो मानसिक त्रास दिला त्याबद्दल दौंड पोलिस ठाण्यात श्री अरुण गाडे अध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.