खासदार संजय राऊत यांची चौफुला येथील शिवसेना कार्यालयास भेट,दौंड तालुक्यातील कार्याचे केले कौतुक


खासदार संजय राऊत यांची चौफुला येथील शिवसेना कार्यालयास भेट,दौंड तालुक्यातील कार्याचे केले कौतुक

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी

प्रतिनिधी ---   दौंड तालुक्यातील शिवसेनेकडून होत असलेली पक्षबांधणी व शिवसेना मध्यवर्ती कार्यालय चौफुला या ठिकाणी होत असलेला जनता दरबार व शिवसैनिकांकडून होत असलेली जनतेची कामे याचा आढावा घेण्यासाठी शिवसेना नेते पक्षाचे मुख्य प्रवक्ते दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक खासदार श्री. संजय राऊत यांची चौफुला येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयास भेट दिली.

याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर यांचे कामाचे कौतुक श्री. संजय राऊत यांनी केले यावेळी दैनिक सामनाचे सहाय्यक संपादक प्रभाकर पवार, उपतालुका प्रमुख विजयसिंह चव्हाण, युवा सेना तालुका समन्वयक समिर भोईटे, पडवी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय चव्हाण, रोटी गावचे माजी सरपंच दीपक भंडलकर, कार्यालयीन प्रमुख प्रशांत खराडे , शिवसेना रोटी शाखाप्रमुख गणपत शितोळे, संदीप कडू, शुभम माळवे, किरण वाघमारे रावणगावचे शाखा प्रमुख सुनिल थोरात व इतर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News