टॅलेंट ऑफ अहमदनगर 2020 गायन स्पर्धेत गौरव भुकन प्रथम तर शांतनु भुकन द्वितीय.


टॅलेंट ऑफ अहमदनगर 2020 गायन स्पर्धेत गौरव भुकन प्रथम तर शांतनु भुकन द्वितीय.

 टॅलेंट ऑफ अहमदनगर 2020 गायन स्पर्धेत भुकन बंधुचे घवघवीत यश.

अहमदनगर (-प्रतिनिधी संजय सावंत) भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र,युनिव्हर्सल फाऊंडेशन,राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ(नवी दिल्ली),जय असोसिएशन ऑफ एनजीओ, महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हाभरातील विविध स्वयंसेवी संस्था यांच्या सहयोगाने सलग तिसऱ्या वर्षी टॅलेंट ऑफ अहमदनगर २०२० या सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धेचे आयोजन ऑनलाईन करण्यात आले होते.या स्पर्धेत गायन विभागात येथील भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल चा इ. ७ वी चा विद्यार्थी चि.गौरव विजय भुकन ने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे तर चि.शांतनु विजय भुकन ने द्वितीय क्रमांक प्राप्त ठरला आहे.शिवजयंती चे औचित्य साधून नुकताच पारितोषिक वितरण सोहळा आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडला. 

शांतनु श्रुती संगीत निकेतन चा विशारद पूर्ण चा विद्यार्थी असून मार्गदर्शक डॉ.धनश्री खरवंडीकर आहे.तसेच गौरव भाऊसाहेब फिरोदिया म्युझिक अॅकेडमीचा विद्यार्थी असून मार्गदर्शक परशुराम मुळे  आहेत.गौरव आणि शांतनुच्या सांगितीक यशाबद्दल संगीत गुरुवर्य डॉ. खरवंडीकर मॅडम, मुळे सर,रोहिणी फुले मॅडम, वर्गशिक्षक सतीश गुगळे,सुरेखा घोलप-भुकन तसेच शिक्षण आणि कलाक्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News