मदनवाडी येथील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या स्मारकाच्या सुशोभिकरणासाठी दोन लाख रुपये - हनुमंत बंडगर सदस्य जि.प.पुणे


मदनवाडी येथील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या स्मारकाच्या सुशोभिकरणासाठी दोन लाख रुपये - हनुमंत बंडगर सदस्य जि.प.पुणे

भिगवण नानासाहेब मारकड प्रतिनिधी:

मदनवाडी येथील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या स्मारकाच्या सुशोभिकरणासाठी दोन लाख रुपये देण्याचे आश्वासन पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य हनुमंतनाना बंडगर यांनी दिले 

मदनवाडी येथील मातोश्री प्रतिष्ठान यांच्या वतीने सालाबादप्रमाणे शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी श्रीराज दत्तात्रय भरणे,भिगवण पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक जीवन माने, इंदापूरचे नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक बाळासाहेब ढवळे इंदापूर कृषी बाजार समितीचे संचालक आबासाहेब देवकाते,श्री.छत्रपती.सा.वाचनालय भिगवणचे अध्यक्ष ॲङ.पांडुरंग जगताप,इंदापूर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष धनंजयदादा थोरात,ऱोटरीचे अध्यक्ष संपततात्या बंडगर,माजी सरपंच तुकाराम बंडगर,कुंडलिकभाऊ बंडगर,उपसरपंच तेजसदादा देवकाते,पत्रकार नानासाहेब मारकङ,दादासाहेब थोरात डॉ.काशीनाथ सोलनकर,भिगवण ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच प्रदीपअण्णा वाकसे,अजिंक्यदादा माङगे,मदनवाङी ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ देवकाते,विश्वासराव देवकाते,अरविंद देवकाते जाफर मुलाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बंडगर यांनी सांगितले की मातोश्री प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद असुन समाजपयोगी आहे. गावामध्ये वृक्षलागवड करुन सवर्धन करण्याचे काम केले आहे. या कार्यक्रमाचे नियोजन अतिशय छान प्रकारे मातोश्री प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News