मराठी पत्रकार परिषदच्या वतीने दर्पणकार तथा मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना ज्येष्ठ पत्रकार दिलीप वाघमारे, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, विजयसिंह होलम, अनिल हिवाळे, विठ्ठल शिंदे, विजय मुळे, अन्सार सय्यद, बाबा ढाकणे, राजेंद्र येंडे, आफताब शेख, उदय जोशी, अनिकेत गवळी, निलेश आगरकर, सचिन शिंदे, विक्रम बनकर, सागर दुस्सल, सचिन कलमदाने, प्रदिप पेंढारे, समीर मन्यार आदी. (छाया-वाजिद शेख-नगर)
जांभेकर यांच्या पत्रकारितेचे अनुकरण होण्याची गरज -दिलीप वाघमारे
अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) मराठी पत्रकार परिषदच्या वतीने दर्पणकार तथा मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ पत्रकार दिलीप वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, विजयसिंह होलम, अनिल हिवाळे, विठ्ठल शिंदे, विजय मुळे, अन्सार सय्यद, बाबा ढाकणे, राजेंद्र येंडे, आफताब शेख, उदय जोशी, अनिकेत गवळी, निलेश आगरकर, सचिन शिंदे, विक्रम बनकर, सागर दुस्सल, सचिन कलमदाने, प्रदिप पेंढारे, समीर मन्यार आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात विजयसिंह होलम यांनी मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मराठी पत्रकार परिषदच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रमाने साजरी केली जाते. मात्र सध्या कोरोनाचे सावट असल्याने ही जयंती गर्दी न करता छोट्या स्वरुपात पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दिलीप वाघमारे म्हणाले की, बाळशास्त्री जांभेकर यांचे वारसदार म्हणार्या पत्रकारांनी त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. त्यांचे नांव घेऊन पत्रकारिता केली जाते, मात्र त्यांचे विचार अंगीकारले जात नाही. जांभेकरांच्या पत्रकारितेचे अनुकरण केल्यास पत्रकारितेला व पत्रकारांना चांगले दिवस येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांचे स्वागत आफताब शेख यांनी केले. आभार राजेंद्र येंडे यांनी मानले.