शिवरायांना आनंद वाटेल अशी शिवजयंती साजरी करावी


शिवरायांना आनंद वाटेल अशी शिवजयंती साजरी करावी

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

मनामनातील भेद दुर करून मनामनात शिवजयंती साजरी झाली पाहिजे - देविदास महाराज म्हस्के 

         छत्रपती शिवाजी महारांजाची जयंती हि पारंपरिक पद्धतीने झाली पाहिजे त्यातुन सामाजिक कार्य घडले पाहिजे, तेव्हाच ती मनामनात साजरी झाल्याचं समाधान मिळेल. महाराजाचा विचार जेव्हा आपण अंगीकृत करू तेव्हाच शिवजयंतीचा शिवरायाना आनंद वाटेल. असे परखड मत वेदांत आश्रम हिंगणगावनेचे मठाधिपती वेदांताचार्य देवीदास महाराज म्हस्के यांनी व्यक्त केले.

         शेवगाव तालुक्यातील भायगाव येथील नवनाथ मंदिराच्या सभागृहात शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली. पन्नास वर्षाहुन अधिक काळ अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा जपणाऱ्या भायगावमध्ये ग्रामस्थ व तरुणांनी एकत्र येऊन  "श्रमदानातुन स्वच्छतेकडे" हा उपक्रम मोठया उत्साहाने राबवला यावेळी प्रा. शिवाजीराव कानडे,देवाकुंरशिदोरे यांची व्याख्याने झाली. फटांक्याच्या आतिषबाजी व जिजाऊ च्या जयघोषात छ्त्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. शेवगाव नेवासा राजमार्ग वरील भगवे ध्वज हे शिवजयंतीचे आकर्षण ठरले.

             यावेळी हरिभाऊ महाराज अकोलकर, माजी सरपंच सर्जेराव दुकळे,अॅड.सागर चव्हाण, प्रा शिवाजी कानडे, राम शिदोरे, देवाकुंर शिदोरे, गणपत आढाव, राजेंद्र दुकळे, विठ्ठल आढाव, शेषेराव दुकळे, रामनाथ आढाव, मुरलीधर दुकळे, साहेबराव आढाव, सखाराम लोखंडे, पाडुरंग आढाव, भास्कर आढाव, प्रवीण लांडे. संतोष आढाव, नारायण आढाव, पांडुरंग नेव्हल, संदीप लांडे, भैय्या घाडगे, संदिप आढाव, प्रमोद दुकळे, कडुबाळ आढाव, आदित्य दुकळे, अजित आढाव, लक्ष्मण लोखंडे, सोमनाथ जाधव, अभिजीत नेव्हल, तेजस आढाव, किरण दुकळे, तुकाराम लोढे, पत्रकार शहाराम आगळे यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

भायगावमधील महिलांकडून धन्यवाद

          भायगावमध्ये पारंपरपारिक पद्धतीने शिवजयंती व्हावी या वेदांताचार्य देवीदास महाराज म्हस्के यांच्या आव्हाणाला भायगाव येथील तरुणानी दिलेल्या प्रतिसादामुळे एक आगळी वेगळे शिवजयंती साजरी करण्यात आली. या जयंतीला गावातील महिला भागिनीनी धन्यवाद देऊन समाधान व्यक्त केले. अशा शिवजयंतीचे पहिले वर्ष होते.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News