कोरोनाचे दौंड तालुक्यात 49 नवीन रुग्ण,80 वर्षीय जेष्ठाचा मृत्यू,गांभीर्याने घ्या-- डॉ सुरेखा पोळ


कोरोनाचे दौंड तालुक्यात 49 नवीन रुग्ण,80 वर्षीय जेष्ठाचा मृत्यू,गांभीर्याने घ्या-- डॉ सुरेखा पोळ

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

 दौंड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून शासनाच्या नियमाचे पालन करून या संसर्गाला गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे डॉक्टर सुरेखा पोळ यांनी सांगितले, ग्रामीण भागात 30 रुग्ण असून शहरी भागात बारा तर एस आर पी एफ चे सात रुग्ण आहेत,असे एकूण 49 रुग्ण शहरी व ग्रामीण भागात आहेत,दोन दिवसापूर्वी 80 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला असून त्यांच्या घरातील तीन व्यक्ती कोरोना बाधित आहेत,माझे कुटुंब माझी जबाबदारी या अंतर्गत सर्वांनी शासनाचे नियमांचे पालन करुन कोरोना विषयी गांभीर्य बाळगणे गरजेचे आहे असे मत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेखा पोळ यांनी मांडले आहे, मागील वर्षी लॉकडाऊन काळात जे नियम होते त्याप्रमाणे गर्दीच्या ठिकाणी न जाणे,मास्क वापरणे सनिटायझर चा वापर करणे, हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे या सर्व गोष्टींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे असे यावेळी डॉक्टर सुरेखा पोळ यांनी सांगितले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News