विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :
कोरोना हा संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढत असून शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे तसे न झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले, कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पोलीस स्टेशन मार्फत दौंड शहरात वीना मास्क फिरणारे यांच्यावर कारवाईला सुरुवात झाली आहे,एका दिवसात विना मास्क फिरणारे 54 जणांवर कारवाई करून दहा हजार आठशे रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले, कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे, नागरिकांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी या अंतर्गत शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून को रोना पासून आपले आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करावे असे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले आहे.