विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :
दौंड तालुक्यातील गार येथे 19 फेब्रुवारी अखंड महाराष्ट्राचे दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात पार पडली , यनिमित्त श्री धारोबा तरुण मंडळ गार, ता दौंड आयोजित शिवजयंती उत्सवात डॉ संदिप गावडे यांचे लोकमान्य हॉस्पिटल, वायरलेस फाटा व रोटरी ब्लड बँक, दौंड यांच्या सहकार्यने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी ग्रामपंचायत गार बेटवाडीच्या नवनिर्वाचित सरपंच डॉ सौं सुलभा संदिप गावडे यांनी लोकांना रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान लोकांना रक्तदानाचे महत्त्व सांगून जास्तीत जास्त नागरिकांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित केले व एक सामाजिक बांधीलकी व गावाच्या प्रथम नागरिक या नात्याने स्वतः रक्तदान करून गावातील ग्रामस्थ, तरुण वर्ग, व महिला यांच्यापुढे एक वेगळा आदर्श घालून दिला. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी मोठया संख्येने रक्तदान केले यामध्ये सर्व आजी माजी सरपंच, सदस्य, चेअरमन, पोलीस पाटील, महिला यांनीही रक्तदान केले.
या वर्षी शिवजयंती निमित्त एक आगळे वेगळे शिबिर आयोजित करून कोणत्याही प्रकारे डीजे डॉल्बी न लावता रक्तदान सारखे महान दान करून निश्चित एक आदर्श गावापुढे ठेवला आहे,यावेळी सर्व प्रथम सकाळी 9 वा गावच्या सरपंच डॉ सौं सुलभा संदिप गावडे व गावातील मान्यवर याच्या शुभ हस्ते श्री शिवाजी महारांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. त्यानंतर गावातील शालेय विद्यार्थ्यांची भाषने घेण्यात आली व मान्यवरांच्या हस्ते त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.75 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याचे डॉक्टर संदीप गावडे यांनी सांगितले,
याप्रसंगी गावच्या सरपंच डॉ सौं सुलभा संदिप गावडे, शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मा श्री शिवाजी नाना नांदखिले, मा सरपंच श्री जयसिंग नाना नांदखिले, मा चेअरमन मा श्री बाळासाहेब नांदखिले, उपसरपंच श्री रामदास सुर्वे, मा. उपसरपंच श्री बाळासाहेब भोसले, अध्यक्ष मा. श्री विकास नांदखिले, मा. श्री प्रशांत घाडगे, मा. उपसरपंच श्री बाळासाहेब निवंगुणे, मा. उपसरपंच मा. श्री शिवाजी निवंगुणे, डॉ श्री संदिप गावडे, ग्रामपंचायत सदस्या सौं लता उत्तम नांदखिले, सदस्य श्री संतोष शितकल, श्री संभाजी होले, श्री सतीश येडे, श्री सचिन भुजबळ धारोबा तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते, ग्रामस्थ, तरुण व महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.