श्री गणेश व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित भिंगारच्या मोफत नेत्रतपासणी शिबीरास नागरिकांचा प्रतिसाद


श्री गणेश व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित भिंगारच्या मोफत नेत्रतपासणी शिबीरास नागरिकांचा प्रतिसाद

सम्राट तरुण मंडळ, फिनिक्स सोशल फाऊंडेशन व आनंदऋषीजी हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) भिंगार येथील सम्राट तरुण मंडळ, फिनिक्स सोशल फाऊंडेशन व आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेश व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. या शिबीरास नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. तसेच गणेश मंदिरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, डॉ. किरण कवडे, संजय शिंदे, अनुज चष्मावाला, प्रशांत शिंदे आदी उपस्थित होते.

संजय सपकाळ म्हणाले की, शिवाजी महाराज एका समाजापुरते मर्यादित नसून, त्यांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना बरोबर घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले. दुर्बल व वंचित घटकांना न्याय मिळण्यासाठी समाजाला त्यांच्या विचारांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जालिंदर बोरुडे म्हणाले की, टाळेबंदीनंतर महागाईचा भडका उडाला असून, सर्वसामान्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न बिकट बनला आहे. खर्चिक आरोग्य सुविधा सर्वसामान्यांना पेळवत नाही. अशा परिस्थितीमध्ये मोफत आरोग्य शिबीर त्यांच्यासाठी आधार ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. किरण कवडे यांनी सम्राट तरुण मंडळाच्या युवकांनी पुढाकार घेऊन राबविलेल्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.आनंदऋषी नेत्रालय यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या शिबीरात 147 रुग्णांची तपासणी करण्यात आली. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 32 रुग्णांची निवड करण्यात आली असून, त्यांच्यावर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिराच्या यशस्वितेसाठी सम्राट तरुण मंडळ व फिनिक्स फाऊंडेशनचे सदस्यांनी परिश्रम घेतले. भिंगार येथील सम्राट तरुण मंडळ, फिनिक्स सोशल फाऊंडेशन व आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेश व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. यावेळी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, डॉ. किरण कवडे, संजय शिंदे, अनुज चष्मावाला, प्रशांत शिंदे आदी.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News