छत्रपती शिवराय यांच्या स्वराज्या मुळे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळे, आपणास खरे स्वातंत्र प्राप्त झाले आहे,,,,,,बाळासाहेब जपे


छत्रपती शिवराय यांच्या स्वराज्या मुळे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळे, आपणास खरे स्वातंत्र प्राप्त झाले आहे,,,,,,बाळासाहेब जपे

शिर्डी,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

राहाता तालुक्यातील सावळीविहीर गावात, छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली. सकाळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला, या वेळी सामाजिक कार्यकर्ते व राहाता कृषी बाजार समितीचे उप अध्यक्ष,बाळासाहेब जपे म्हणाले की, छत्रपती शिवराय यांच्या स्वराज्या मुळे व डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळे ,आपणास खरे स्वातंत्र प्राप्त झाले आहे, या दोन्ही महापुरुषांचे विचार जर आपण आचरणात आणले तर आपली प्रगती कोणीच रोखू शकत नाही, कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते,सरपंच,ग्रामपंचायत सदस्य, तरुण मंडळे, नागरिक मोठ्या संख्येने उपस्तीत होते, सवळीविहीर गाव भगवे वातावरण निर्माण झाले होते. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषणे परिसर दनानला,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News