कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्र व हीलींग हँड्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन


कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्र व हीलींग हँड्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने  शिबिराचे आयोजन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

कुरकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुणे येथील हीलींग हँड्स फाउंडेशन पुणे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र कुरकुंभ यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, दिनांक १८/०२/२०२१ रोजी मा. ना. प्राथमिक आरोग्य केंद्र कुरकुंभ व हीलींग हँड्स फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर कुरकुंभ येथे तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.

डॉ उत्तम कांबळे ,डॉ पाखरे, मेडिकल ऑफिसर ,सर्व आरोग्य कर्मचारी,आशा वर्कर, हिलींग हँडस फाउंडेशन कडून डॉ योगेश येळवंडे,किरण अरडे,अनंत मिसळ,अनिता सैद उपस्थित होते

 तेजश्री खलाटे यानी रुग्णांना मार्गदर्शन केले गेले 4 वर्ष संस्था कॅम्प घेत आहे लोकांना याचा चांगला फायदा होत आहे

शिबीर सकाळी ११ ते १ या दरम्यान घेण्यात आले, सदर शिबिरात 70 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले

सौ.अनिता सैद (शिबीर व कार्यक्रम व्यवस्थापक),  व सदर शिबिरास सौ.मधुरा भाटे (संस्था समन्वयक) यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News