चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या चोरट्याने काहीच न मिळाल्यामुळे नवविवाहितेवर केले चाकूचे वार


चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या चोरट्याने काहीच न मिळाल्यामुळे नवविवाहितेवर केले चाकूचे वार

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी

प्रतिनिधी -- चौफुला सुपे रोडवर देऊळगाव गाडा येथे भरदिवसा एका घरात घुसून तीन चोरट्यांनी   त्यांना काहीच न मिळाल्यामुळे त्यांनी घरातील नवविवाहितेवर चाकूने वार करून पलायन केले आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे यांनी दिली आहे, ही घटना दौंड तालुक्यातील देवळगाव गाडा येथील कवठीच्या मळ्यात  दुपारी बारा ते साडेबाराच्या सुमारास घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तनुजा प्रशांत बारवकर (वय -23) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्यासह यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, चौफुला-सुपा रस्त्यावर देवळगाव गाडा गावच्या हद्दीत कवठीच्या मळ्यात मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर नंदू बारवकर यांचे घर आहे. मात्र चोरी झालेल्या घरात फक्त जखमी तनुजा एकट्या होत्या. घरातील इतर लोक कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान तीन जण तोंड बांधून अचानक घरात शिरले.त्यांनी लाकडी कपाट तोडून त्यातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त टाकून दिले, त्यामध्ये त्यांना काहीच न मिळाल्यामुळे त्यांनी तनुजा यांच्या डाव्या हातावर चाकूने वार करून पलायन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे पुढील तपास करीत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News