पळशीत शिवजयंतीनिमित्त "शेवटचं पान" या वेबसिरीजचं शूटिंग, ग्रामीण भागातील कलाकारांना मिळतेय संधी


पळशीत शिवजयंतीनिमित्त "शेवटचं पान" या वेबसिरीजचं शूटिंग,  ग्रामीण भागातील कलाकारांना मिळतेय संधी

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

पळशी (ता. बारामती) याठिकाणी खूप दिवसांनी पुन्हा एकदा रोल, कॅमेरा, ॲक्शनचा आवाज घुमला. उत्साही वातावरणात शिवजयंतीनिमित्त समाजाला एक आदर्श देण्यासाठी शेवटचं पान या वेबसिरीजचं शूट पळशीत करण्यात आल्याचं निर्माते, दिग्दर्शक किरण गाजरे यांनी यावेळी सांगितलं.

   ग्रामीण भागात अभिनयाची आवड असणाऱ्या नवोदित कलाकारांना एकत्रित करून समर्थ फिल्म प्रोडक्शन आणि प्रेमवारी प्रोडक्शन गेल्या काही दिवसांपासून काम करीत आहे. यातून ते समाजाचे प्रबोधन करीत वेगवेगळे संदेश देण्याचे काम

करीत आहेत. या वेबसिरीजचे निर्माते, दिग्दर्शक किरण गाजरे हे असून ग्रामीण भागातील होतकरू कलाकारांना एक नवीन प्लॅटफॉर्म भेटावा, तसेच त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा, मान सन्मान मिळावा यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात. या वेबसिरीज मध्ये काम केलेल्या काही कलाकारांना मालिका, चित्रपटांमध्येही संधी मिळाली आहे. 

 सुंदरी आणि शेवटचं पान या वेबसिरीजच्या माध्यमातून आम्ही कलाकारांना काम करण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत असंही गाजरे यांनी सांगितले.

 यावेळी जयदीप पारधे, महादेव फणसे, मानसी काळे, आविष्कार कदम, ओंकार सावंत, राज धनगर, अक्षय रंधवे हे कलाकार उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News