गोपाळवाडी गावची श्रीनाथ म्हस्कोबा माता जोगेश्वरी यात्रा यावर्षी रद्द कोरोना पार्श्व भूमीवर घेतला निर्णय


गोपाळवाडी गावची श्रीनाथ म्हस्कोबा माता जोगेश्वरी यात्रा यावर्षी रद्द कोरोना पार्श्व भूमीवर घेतला निर्णय

विठ्ठल होले विशेष प्रतिनीधी :

 दौंड तालुक्यात प्रसिद्ध असलेले गोपळवाडी येथील श्रीनाथ म्हस्कोबा माता जोगेश्वरी यांची यात्रा रद्द करण्यात आली आहे, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, 26 फेब्रुवारी रोजी देवाचा लग्न सोहळा आणि नऊ दिवस मिरवणूक आणि सात आणि आठ मार्च रोजी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित होते, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यात्रा रद्द करण्यात आल्याचे तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल होले यांनी सांगितले आहे,सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

दौंड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सर्व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी नसल्याचे त्यांनी सांगितले, देवाचे सर्व धार्मिक विधी पन्नास लोकांच्या उपस्थितीत शासनाचे सर्व नियमांचे पालन करून करण्यात यावेत असेही त्यांनी यावेळी सूचित केले, यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल होले,पोलीस पाटील वर्षा लोणकर, सरपंच सौ लक्ष्मी होले, बबन लव्हे, अशोक सूळ, बाळासो गिरमे, शिवाजी पवार देवाचे भगत विश्वनाथ होले,दत्तात्रय होले,भीमराव होले शांताराम होले राजू होले जयसिंग दरेकर, चंद्रकांत होले,बंटी शिंदे भीमराव चोरमले, दादासो पवार, कामादास दरेकर,बापू पवार, चांगदेव शेंडे, संतोष होले,अशोक जवक, किसन चोरमले, किशोर टेकवडे,सुरेश भुजबळ, शरद होले, रावसो  शिंदे तसेच गावातील मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News