अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत)
प्रतिनिधी : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विळदच्या ज्ञानगंगा विद्यालया मधील विद्यार्थ्यांना महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगर तालुका विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. नगर तालुका विद्यार्थी काँग्रेसचे सुजित जगताप यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राबवला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विळदचे माजी सरपंच आबासाहेब पवार होते. यावेळी पंजाबराव अडसुरे, हंसराज अडसुरे, स्कूल कमिटीचे अध्यक्ष विजय अडसुरे, सुनील जवरे, नितीन जगताप, विकास शिंदे, कैलास शिंदे, संदीप जगताप यांच्यासह विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता.
यावेळी बोलताना सुजित जगताप म्हणाले की, ना.बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याचे तालुक्यातील विद्यार्थी काँग्रेसने ठरवले. त्या भूमिकेतूनच आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये येताना कोरोनाच्या नियमांचे काटेकोपणे पालन करत स्वतःची काळजी घेतली पाहिजे.