शेवगाव तालुका सदिच्छा मंडळाच्या तालुका सरचिटणीस पदी जावळे यांची निवड


शेवगाव  तालुका सदिच्छा मंडळाच्या तालुका सरचिटणीस पदी जावळे यांची निवड

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण:

रामेश्वर दादासाहेब जावळे यांची निवड झाली आहे. सदिच्छा मंडळाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब डमाळ व शिक्षक बॅंकेचे मा. संचालक विनोद फलके यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.

नेतृत्व गुण, संघटन कौशल्य,  प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न  परखडपणे मांडण्याची हातोटी या गुणांचा विचार करून रामेश्वर जावळे यांची सदिच्छा मंडळाच्या तालुका सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. असे सदिच्छाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब डमाळ यांनी सांगीतले. प्राथमिक शिक्षक जावळे हे दिवटे गावचे रहिवासी असून त्यांची जालना जिल्ह्यातून बदली सोनविहीर ( ता. शेवगाव ) येथे नुकतीच झाली. जालना जिल्हयात प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी मोठे संघटन केले होते. सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग असून मोठा मित्रपरिवार शेवगाव तालुक्यात आहे. या वेळी सदिच्छा मंडळाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब डमाळ , शिक्षक बॅंकेचे मा. संचालक विनोद फलके, सदिच्छा मंडळाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग नांगरे, सदिच्सछा मंडळाचे जिल्हा लेखापाल बबनराव ढाकणे, जावळे यांचे अंबडचे मित्र राजन पाटील ढोले, शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष संदिप कातकडे आदी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News