शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण
यंदा गळीत हंगाम जोमात असून यावर्षी मे ते जून महिन्यापर्यंत साखर कारखाने चालू राहणार आहेत परंतु दररोज डिझेलच्या भावा मध्ये वाढ होत असल्याने वाहतूकदार ट्रॅक्टर व ट्रक यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे या भाववाढीमुळे वाहतूक परवडत नसल्याने यावरती तातडीने ऊपाययोजना करावी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व कारखानदारांनी वाहतुकी मध्ये प्रति किलोमीटर भाववाढ करण्याची मागणी सह साखर आयुक्त अहमदनगर यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड दत्ताभाऊ फुंदे यांनी केली आहे