शिर्डी,साईबाबा महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान, कायदे मोडणाऱयांवर कार्यवाही होणार,,,,,न्याहाळदे


शिर्डी,साईबाबा महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान,  कायदे मोडणाऱयांवर कार्यवाही होणार,,,,,न्याहाळदे

शिर्डी -राजेंद्र दूनबळे

श्री साईबाबा साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा महाविद्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, प्रशासकीय अधिकारी दिलीप उगले  यांचे मार्गदर्शनाखाली 32 व्या रस्ते सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले. 

प्राचार्य विकास शिवगजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात शिर्डी पोलिस स्टेशनच्या वाहतूक शाखेचे  पोलिस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गत वाहतूक विषयक नियमांचे सखोल असे ऑनलाईन व ऑफलाईन व्याख्यान दिले. यावेळी न्याहाळदे म्हणाले की, आपला जीव अनमोल आहे, त्यामुळे विद्यार्थांनी विना हेलमेट दुचाकी वाहन चालवू नये. ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय वाहन चालवून आपला आणि समोरच्याचा जीव धोक्यात घालवू नये.विद्यार्थ्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याकरीता उप विभागीय परिवहन कार्यालय श्रीरामपूर यांचे मार्फत विशेष शिबीर आयोजित करण्यात येईल. याचा विद्यार्थ्यानी लाभ घ्यावा. महाविद्यालयातील विद्यार्थीनींना रोड रोमिओंचा त्रास होत असेल तर लक्षात आणून द्यावे, त्या रोडरोमीओंचा पोलिसांकडून निश्चितच बंदोबस्त केला जाईल. यावेळी प्राचार्य विकास शिवगजे म्हणाले की देशातील कायदे,नियम यांचे पालन केल्याने,आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडल्यानेच आपल्या हातून देश सेवा घडत असते. विद्यार्थ्यांनीच देशसेवा करतांना याचेच भान ठेवावे.कधीही कायद्याचे आणि नियमांचे उल्लंघन करू नये.    

युवा व क्रीडा मंत्रालय, नवी दिल्ली, भारत सरकार आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, भारत सरकार यांनी निर्देशीत केल्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विठापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संलग्नीत महाविद्यालयांमध्ये दि. १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी २०२१ दरम्यान रस्ता सुरक्षा माह राबविण्यात येत आहे.  या रस्ता सुरक्षा माहची "सडक सुरक्षा जीवन रक्षा " ही संकल्पना असून या अभियानात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, भारत सरकार यांच्या परिपत्रकानुसार उपक्रम राबविण्यात येत आहेत. सदर उपक्रम राबविताना कोरोना साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव पाहता शासकीय नियमांचे पालन करण्यात येत आहे. 

यावेळी शिर्डी वाहतूक शाखेचे सूरज गायकवाड,सचिन शिरसाठ, उमेश सूर्यवंशी,पत्रकार हेमंत शेजवळ, प्रशांत अग्रवाल आणि विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.संतोष औताडे यांनी प्रास्ताविक करून आभार मानले. प्रा.मुबीन शेख यांनी सूत्रसंचालन केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News