दौंडकरानो सावधान,दौंड मध्ये कोरोना पुन्हा सक्रिय, तब्बल 11 पॉझिटिव्ह


दौंडकरानो सावधान,दौंड मध्ये कोरोना पुन्हा सक्रिय, तब्बल 11 पॉझिटिव्ह

विठ्ठल होले विशेष प्रतिनीधी :

- दौंड मध्ये कोरोना पुन्हा सक्रिय झाला आहे, दिनंक 16(2/21रोजी दौंड उपजिल्हा रुग्णालय येथे तपासणी मध्ये 11 जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती डॉक्टर संग्राम डांगे यांनी दिली आहे, दौंड उपजिल्हा रुग्णालय येथे 126 जणांची रॅपिड एंटीजन तपासणी करण्यात आली त्यामध्ये तब्बल अकरा जण पॉझिटिव्ह आले आहेत तर 115 निगेटिव आहेत,तर दौंड तालुक्यात पाटस येथे दोन दिवसात पंधरा रुग्ण सापडले आहेत, त्यामुळे दौंड करांच्या काळजीत भर पडली आहे, दोन महिन्यांच्या  विश्रांतीनंतर एकाच दिवसात अकरा जण पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याचे डॉक्टर मिलिंद कांबळे यांनी सांगितले आहे त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे,मास्क वापरणे, सॅनिटायझर चा वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे या सर्व गोष्टींचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे असे डॉक्टर संग्राम डांगे यांनी सांगितले आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News