मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी
पुणे - मॅग्नोलिया वुमन्स असोसएशन तर्फे लग्न ठरवताना या विषयावर वधु वर आणि पालकांसाठी अनुरूप विवाह संस्थेचे मा.तन्मय कानिटकर यांचे मार्गदर्शन व मुलाखती कार्यक्रम घोले रोड येथील नेहरू सभागृहात दि.१४.२.२०२१ रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत संपन्न झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हॉटेल कपिलाच्या संचालिका गौरी ढोलेपाटील आणि कार्यक्रमाचे अध्यक्षा नुतन बनकर उपस्थित होते.याप्रसंगी वधु वर यांचे लग्न जुळवीण्यासाठी गेली 20 वर्षे पेक्षा जास्त ज्या समाजसेवकांनी/विवाह संस्थेने कार्य करून समाजसेवा केली त्याचा मॅग्नोलिया वुमन्स असोसएशन तर्फे तन्मय कानिटकर , नूतन बनकर आणि गौरी ढोलेपाटील यांचे शुभहस्ते नाना देडगे ,सुदाम धाडगे ,आदेश बोरावके ,मासिक माळी आवाजचे रागिणी लडकत,पांडुरंग गाडेकर,हनुमंत टिळेकर व प्रदीप जगताप तसेच सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी वधु वर यांचे विवाह जुळवीत सत्यशोधक विवाह पुणे व पुणेचे बाहेर जावून गेली अडीच वर्षात २४ पूर्णपणे मोफत लावले. बरेच ठिकाणी जातीय अंतरजातीय, बिजवर, दिव्यांग, घटस्पोटीत, अंतरराज्यीय ,अंतरराष्ट्रीय तसेच मंत्र्याचे घरातील आणि ब्राह्मण समाजातील पहिला सत्यशोधक विवाह लावले.त्यांनी कोव्हिड काळात देखील ५ सत्यशोधक विवाह लावून समाजात आर्थिक उधळपट्टी करू नये आणि अंधश्रद्धा ,कर्मकांड या पासून दूर रहावे हा संदेश देत खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकर यांचे कार्याचा प्रसार रघुनाथ ढोक यांनी केला म्हणून त्यांचा विशेष सत्कार केला.तसेच सीए मध्ये चांगले मार्क्सने पास झाली म्हणून कु.हिना नवले हिचा देखील गौरव करण्यात आला.
यावेळी तन्मय कानिटकर यांनी मौलिक मार्गदर्शन करताना काही उदाहरणे देत मुलाखतीच्या माध्यमातून अनेक प्रश्नाचा उलघडा करीत लग्न जुळवताना पत्रिका,मुहूर्त पहाण्याची काहीही गरज नसुन एकमेकांना जीवनसाथी म्हणून योग्य आहे का हे पहावे.तसेच विज्ञान इतके पुढे गेले आहे की त्या ठिकाणी रक्तगट वगैरे गोष्ठी गौण झालेत .एकमेकांचे पगार, शिक्षण , रंग, रूप अति महत्वाचे न मानता आपण एकमेकांना कसे सुट होऊ हे बघावे.खरे तर या पुढे वधू वर यांनी मेडीकल व इतर तपासणी करणे अत्यंत जरुरीचे आहे त्यामुळे भविष्यात होणारे अडथळे दूर होतील .तसेच वधु वर यांनीच लग्न ठरविण्यासाठी पुढे आले तर लग्नकार्य सिद्धीस नेणे सुकर होईल. विशेष म्हणजे लग्न झालेवर पालकांनी हस्तक्षेप करू नये अशी अपेक्षा आहे.पुढे कानिटकर असेही म्हणाले की विवाह संम्मतीने अथवा प्रेमविवाह करून जरी केला तरी पुढील सहजीवन सारखेच असते त्यामध्ये काही बदल होत नाहीत.
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक मध्ये नूतन बनकर यांनी आज पर्यंत महिलांसाठी आरोग्य शिबिरे, नवनवीन व्यवसाय व खाद्य पदार्थ विक्री करीता कायमचे विक्री केंद्र निर्माण करून या माध्यमातून महिलांना उद्योजक बनविलेचे म्हटले.या कार्यामुळे अल्पावधीत आमचे असोसिएशनचे सभासद महिला महाराष्ट्रसह विदेशातील जोडल्या गेल्याचे देखील सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मुलाखती मयुरा दरोडे तर मान्यवरांचा परिचय प्रा.अपर्णा जमदाडे आणि आभार अर्चना होवाळ हिने मानलें.तसेच मोलाचे सहकार्य जयश्री दरोडे,राजश्री कचरे,उर्मिला भोंगळे,सुवर्ण ढोलेपाटील,दीपाली गायकवाड, शुभांगी गिरमे यांनी केले.