भायगावात शिवजयंती उत्सव समितीची बैठक उत्साहात संपन्न


भायगावात शिवजयंती उत्सव समितीची बैठक उत्साहात संपन्न

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

           शेवगाव- नेवासा राजमार्गावरील भायगाव येथे १९ फ्रेबुवारी २o२१ला होणाऱ्या शिवजयंती उत्सवासंदर्भात नवनाथ मंदिराच्या सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शिवजयंतीनिमित सामाजिक व धार्मिक कार्यक्रमानी साजरी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. सायंकाळी 7 वाजता फटांक्याच्या आतिषबाजीतव शिवराय व जिजाऊच्या जय घोषात छत्रपती शिवरायांना आभिवादन करण्यात येईल व त्यानंतर प्रा. शिवाजीराव कानडे यांचे व्याख्यान होईल. यावेळी गरजु व निराधारांना वस्त्रदान, व शालेय मुलांमुलीना वहीव पेनचे वाटप . तसेच संपुर्ण दिवसभर श्रमदान करून  जिल्हा परिषद शाळा व देवालय परिसर स्वच्छ करण्यात येईल. अशी माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली.

       या बैठकीला ह.भ.प. हरिभाऊ महाराज अकोलकर, अॅड.सागर चव्हाण, विठ्ठल आढाव, गणपत आढाव, राजेंद्र दुकळे, संतोष आढाव, सखाराम लोखंडे, कडुबाळ आढाव, संदिप लांडे, प्रवीण लांडे, भास्कर आढाव, अशोक दुकळे, पांडुरंग नेव्हल, अभिजीत आढाव, सोमनाथ जाधव, रोहिदास काळे, बाळासाहेब लोढे, तेजस आढाव, सचिन दुकळे, अजित आढाव, अक्षय जगताप, कडुबाळ शेकडे, उध्दव शेकडे, मच्छिंद्र आढाव, तुकाराम लोढे, अजय नेव्हल, लक्ष्मण लोखंडे, आदिनाथ आढाव, आभिजीत नेव्हल, गौरव शहाणे, ऋषीकेश नेव्हल, रोहित खाटिक, संदिप आढाव, अशोक दुकळे, पत्रकार शहाराम आगळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News