बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)
चोपडज (ता.बारामती) येथील पंचदैवत मंदिराच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त "चांडाळ चौकडीच्या करामती" वेबसिरिज फेम बाळासाहेब उर्फ ह.भ.प. भरत शिंदे महाराज (कांबळेश्वर) यांच्या कीर्तनाचा १४ फेब्रुवारी रोजी रात्री कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बाळासाहेबांनी आपल्याला विनोदी शैलीत कीर्तनाच्या माध्यमातून ग्रामस्थांचे प्रबोधन केले. संगत चांगली असेल तर चांगलंच घडतं. कीर्तनात हार्मोनियम वाजवणे किंवा पकवाज, मृदंग वाजवणे सोपे नसतं, यासाठी सुद्धा खूप मेहनत घ्यावी लागते असं बाळासाहेब यांनी सांगितले.यावेळी चोपडज तसेच पंचक्रोशीतील भाविक, विशेषता महिला मोठ्या संख्येने हे कीर्तन ऐकण्यासाठी उपस्थित होत्या.