स्वयंसेवी संघटनांच्या वतीने व्हेलनटाईन डे ला कॉ. बाबा आढाव यांचा सन्मान


स्वयंसेवी संघटनांच्या वतीने व्हेलनटाईन डे ला कॉ. बाबा आढाव यांचा सन्मान

दि ग्रेट लॉरिस्टर ऑफ इंडियन वर्किंग क्लास हा सन्मानाने मानवंदना

श्रमिक कामगारांसाठी देव माणुस म्हणून कॉ. आढाव यांची ओळख -अविनाश घुले

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - वंचित, दुबळे व श्रमिक कामगारांना न्याय मिळण्यासाठी संपुर्ण आयुष्य खर्च करणारे कॉ. बाबा आढाव यांना पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने व्हेलनटाईन डे च्या दिवशी हुतात्मा स्मारकात दि ग्रेट लॉरिस्टर ऑफ इंडियन वर्किंग क्लास हा सन्मानाची मानवंदना देण्यात आली. कॉ. आढाव यांनी वंचित, दुबळे व श्रमिकांप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल स्वयंसेवी संघटनेच्या वतीने वर्चुअल पध्दतीने हा सन्मान सोहळा पार पडला. 

महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व हमाल, मापाडी व कामगार चळवळीचे नेते स्व.शंकरराव घुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी हमाल पंचायतचे अध्यक्ष तथा नगरसेवक अविनाश घुले, अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, विठ्ठल सुरुम, अशोक भोसले, पोपट भोसले, शाहीर कान्हू सुंबे, अंबिका नागुल, फरिदा शेख, आशा वडागळे, गोपीनाथ म्हस्के, सुशीला नारायण, गीता डहाळे, शिवाजी वाघमारे, संतोष नांगरे आदि उपस्थित होते.अविनाश घुले म्हणाले की, श्रमिक कामगारांसाठी देव माणुस म्हणून कॉ. बाबा आढाव यांची ओळख आहे. त्यांनी कष्टकरी, माथाडी, हमाल आदी असंघटित कामगारांना संघटित करुन चळवळीच्या माध्यमातून न्याय देण्याचे कार्य केले. त्यांनी हमाल माथाडींसाठी कायदा करुन घेतला. वंचित, दुबळ्या लोकांसाठी त्यांनी आपले आयुष्य खर्च केले. या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान करण्याची गरज होती. सर्वसामान्यांच्या वतीने देण्यात आलेला हा सन्मान देखील मोठा असल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी अविनाश घुले यांची निवड झाली असता घरकुल वंचितांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तर वारुळाचा मारुती परिसरातील महापालिकेच्या जागेत घरकुल वंचितांसाठी प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी करण्यात आली. घुले यांनी या भागात असलेल्या उद्यानाचे आरक्षण उठवून घरकुल वंचितांचा प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचे यावेळी आश्‍वासन दिले.

अ‍ॅड. कारभारी गवळी म्हणाले की, असंघटित कामगारांचे नेतृत्व कॉ. बाबा आढाव यांनी केले. ते राजकारणात गेले असते, तर त्यांना मोठे पद देखील मिळाले असते. मात्र श्रमिक, कष्टकर्‍यांच्या वेदना व दु:ख कमी करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्च केले. स्वार्थी राजकारणापेक्षा निस्वार्थ भावनेने त्यांनी कामगार चळवळ चालवली. त्यांच्या प्रेमापोटी स्वयंसेवी संघटनांनी व्हेलनटाईन डे च्या दिवशी त्यांचा सन्मान केला असल्याचे त्यांनी सांगितले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News