परीक्रमा संताना मान्य असून पुण्य साध्य करण्याचा मार्ग असल्याचे मंहत श्री काशिकानंद महाराज यांनी शिर्डी प्रसंगी केले.


परीक्रमा संताना मान्य असून पुण्य साध्य करण्याचा मार्ग असल्याचे मंहत श्री काशिकानंद महाराज यांनी शिर्डी प्रसंगी केले.

शिर्डी राजेंद्र दूनबळे

हिंदू शास्त्राच्या आधार म्हणजे संत वचनाचे पालन आहे. ते पालन ग्रीन एन क्लिन शिर्डी करत असून त्यांच्या माध्यमातूनच शिर्डी परीक्रमा प्रचार आणि प्रसार परीक्रमा होत आहे. ही परीक्रमा संताना मान्य असून पुण्य साध्य करण्याचा मार्ग असल्याचे मौलिक मार्गदर्शन मंहत श्री काशिकानंद महाराज यांनी शिर्डीत प्रसंगी केले. ते शिर्डीतील खंडोबा मंदीरात आयोजित परीक्रमा प्रचार व प्रसाराच्या शुभारंभाप्रसंगी मार्गदर्शन करत होते. या प्रसंगी ग्रीन एन क्लिन शिर्डीचे अध्यक्ष अजित पारख, उपनगराध्यक्ष सचिन कोते, माजी विश्वस्त सचिन तांबे, मणिलाल पटेल, प्रा.रघूनाथ गोंदकर, ॲड अनिल शेजवळ, संजय शिर्डीकर, जेष्ठ भक्त छोटूभाई भाटीया, तुषार महाजन डॉ.धनंजय जगताप, प्राध्यापक  रघुनाथ गोंदकर दादासाहेब काळे, रविकीरण डाके, प्रसाद वेद, महेश वैद्य, प्रा. विशाल तिडके, मयूर चोळके, सागर वाल्हेकर, नरेश सोनवणे,नितीन शिंदे, संतोष बनसोडे, प्रथमेश मेहेर, दिलीप गोंदकर, अक्षय गोंदकर, आदीसह मान्यवर उपस्थित होते.परिक्रमेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. पुढे काशिकानंद महाराज म्हणाले की, साईबाबा हयातीत असतांना जे काही उपक्रम सुरु ते आजतागायत सुरु आहेत. त्या धर्तीवर ग्रीन एन क्लिन शिर्डीच्या माध्यमातून शिर्डी परीक्रमा सुरु झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अत्यंत खडतर काळात ही परीक्रमा सुरु झाली. त्यानंतर या दुस-या वर्षीही सुरु आहे. कोणत्याही कार्यात सातत्य राहील्यास ते कार्य पुर्ण फळाला जात असते. संताना मान्य असणारा असा हा स्तूत्य उपक्रम आहे. नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पूण्या नाही गणना. ही प्रदक्षिणा अनंत पुण्य प्राप्त करून देणारी आहे. या माध्यमातून भाविकांना तप, जप, मिळणार आहे. त्यासाठी येत्या दि.15 मार्च रोजी होणा-या शिर्डी परीक्रमेचा भाविकांनी लाभ घ्यावा. उत्तरोत्तर हा उपक्रम वाढीस जाणार असल्याचा विश्वास काशिकानंद महाराज यांनी व्यक्त केला. इवलिशे रोप लाविले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी. धर्माच काम करणार ग्रिन अँड क्लिन शिर्डी आहे.  शिर्डी परीक्रमेचे प्रचार आणि प्रसार फेरी उत्साहात सुरवात झाली. खंडोबा मंदीरात काशिकानंद महाराज यांच्या हस्ते शिर्डी माझे पंढरपूर ही आरती करण्यात आली. ज्योत प्रज्वलन महाराजांच्या हस्ते करण्यात आले. माजी विश्वस्त सचिन तांबे व उपनगराध्यक्ष सचिन कोते यांच्या हस्ते परीक्रमेचा नारळ वाढवण्यात आला. संपुर्ण परीक्रमेत भाविकांच्या ओठी साई नामाचा जप होता. योगेश काटकर व ताराचंद कोते यांनी या भाविकांना चहापाणी व अल्पोहाराची उत्तम व्यवस्था केली. तर काशिकानंद महाराज यांनी ही परीक्रमा पूर्ण करुन भाविकांचा उत्साह वाढविला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News