सरपंच अशोकराव जमधडे, व उपसरपंच सौ,सपनाताई वर्पे यांचा सावळीविहीर बुद्रुक गावाच्या वतीने सत्कार !


सरपंच अशोकराव जमधडे, व उपसरपंच सौ,सपनाताई वर्पे यांचा सावळीविहीर बुद्रुक गावाच्या वतीने सत्कार !

शिर्डी राजेंद्र दूनबळे,

राजकारणामध्ये घरावर तुळशीपत्र ठेवून समाजकार्य करावे लागते, मात्र तरीही राजकारण्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदलत चालला आहे ,मात्र अनेक राजकारणी हे राजकारण कमी व समाजकारण ज्यादा करत असतात म्हणूनच ते कायम कायम निवडून येऊन समाजकार्य करत असतात व ते समाजकार्य चे व्रत हे प्रत्येक राजकारणाच्या रक्तात असते म्हणूनच असे घडत असते, असे मत सावळीविहीर खुर्द ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच अशोकराव श्रीपतराव जमधडे पा,यांनी व्यक्त केले, सावळीविहीर बुद्रुक ग्रामस्थांच्यावतीने अशोकराव जमदडे व उपसरपंच सौ, सपना ताई सुधीर वर्पे यांचा नुकतीच सरपंच उपसरपंच निवड झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला, सावळविहीर खुर्द गावचे सरपंच व उपसरपंच यांची बिनविरोध निवड झाली, ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड यापूर्वी झाली होती ,हाच आदर्श घेऊन शेजारच्याच सावळीविहीर बुद्रुक ग्रामस्थांनी या सरपंच उपसरपंच यांचा यथोचित सत्कार केला ,प्रथमच दुसर्‍या गावच्या सरपंच उपसरपंच यांचा आपल्या गावात सत्कार ग्रामस्थांच्या वतीने केला जातो ही एक चांगली व अभिमानाची गोष्ट आहे ,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संतोष एकनाथ आगलावे होते, या कार्यक्रमात राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब जनार्धन जपे यांनी सरपंच आशोकराव जमदाडे कॉलेजला असताना विद्यापीठ प्रतिनिधी होते तेव्हापासूनच ते राजकारण समाजकारण करत आले.अनेक वर्षापासून ते राजकारणात समाजकारणात आहेत. आपल्या मितभाषी व सर्वांना मिळून त्यांनी समाजकारण अधिक व राजकारण कमी केले, त्यामुळेच ते आज सरपंच बिनविरोध झाल्या आहेत, यापूर्वी राहाता कृषी उत्पन्न बाजार समिती वर ते उपसभापती होते ,त्यांचे कार्य व त्यांचा स्वभाव ,व्यक्तिमत्व हे सर्वांशी मिळून मिसळून असल्यामुळेच ते आज हे पदावर मी निवडुन ईले आहेत, असे सांगितले तर माजी सरपंच अशोकराव पाटील आगलावे यांनी बिनविरोध निवडणूक होणे व सरपंच बिनविरोध होणे या आजच्या युगामध्ये एक चांगली व आदर्शाची गोष्ट आहे व हे घडले पाहिजे तर अ,फ,शेख गुरुजी यांनीही सावळीविहिर खुर्द चे अशोकराव जमदाडे व उपसरपंच सौ सपनाताई सुधीर वर्पे यांचे बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले, यावेळी माजी सभापती जिजाबा आगलावे यांनीही यावेळी सरपंच उपसरपंच यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करत त्यांच्या समाजकार्याचा गौरव केला ,यावेळी सत्काराला उत्तर देताना सरपंच अशोकराव जमधडे यांनी सांगितले की, मी सावळीविहीर खुर्द चा सरपंच झालो असलो तरी सावळीविहीर बुद्रुक या गावाने माझा सन्मान केला त्याबद्दल मी आभारी आहे, यानंतर उपसरपंच सौ, सपनाताई सुधीर वर्पे यांनीही सावळीविहीर बुद्रुक ग्रामस्थांनी आमचा येथे बोलावुन सन्मान केला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आभार मानले ,या कार्यक्रमाला माजी सरपंच रमेश आगलावे, सोपान पवार, नवनाथ  जपे,सुनील आगलावे, गणेश आगलावे, लक्ष्मणराव मातेरे पाटील, शिवाजी आगलावे, महेश जमधडे ,सुधीर वर्पे, , पोलीस पाटील सौ,सुरेखा सुरेश वाघमारे, प्रमोद कोपरे, अनिल वाघमारे, सोपानराव गंगाधर जपे, राजेंद्र परसराम आगलावे, सुरेश वाघमारे,सा,वि,बु, सोसायटीचे सेक्रेटरी संतोष वाघमारे ,सावळविहीर खुर्दचे माजी उपसरपंच सूर्यभान माळी, ग्रामविकास अधिकारी रावसाहेब खर्डे , विकास जपे, आदींसह गावातील ग्रामस्थ व संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News