एकदंत गणेश मंडळाच्यावतीने आरोग्य, दंत, नेत्रतपासणी, मोतिबिंदू शिबीर व औषध वाटप संपन्न


एकदंत गणेश मंडळाच्यावतीने आरोग्य, दंत, नेत्रतपासणी, मोतिबिंदू शिबीर व औषध वाटप संपन्न

एकदंत गणेश मंडळाचे कार्य हे परमार्थाची सेवा - बोरुडे

नगर :-(प्रतिनिधि संंजयसावंत ) मोफत शिबीर म्हटलं कि रुग्ण पाठ फिरवित असतात कारण शिबीरात शस्त्रक्रिया चांगली होईल की नाही अशी भिती वाटायची पण सध्या नगर शहर, उपनगरात, ग्रामीण भागात सध्या सेवा-भावी संस्थांनी मोफत नेत्र तपासणी, मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे घेवून हजारो रुग्णांना दृष्टी देऊन मोफत शिबीरात चांगले काम होत असल्याचे सिद्ध केले.  गणेश जयंती म्हणजे एक धार्मिक कार्यक्रम, या कार्याक्रमाच्यावतीने माध्यमातुन मंडळाने मोफत आरोग्य शिबीरे घेवुन  मंडळाचे कार्य हे एकप्रकारची परमार्थाची सेवा आहे, दुवा बरोबर दवा देण्यासारखे आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांनी केले. 

श्री गणेश जयंती निमित्त दातरंगे मळा येथील एकदंत कॉलनीत श्री एकदंत गणेश मंदीराच्यावतीने गणेश भाविकांना भव्य नेत्र तपासणी, अल्पदरात मोतिबिंदू शस्त्रक्रिया, मोफत आरोग्य तपासणी, दंत तपासणी व मोफत औषध वाटप शिबीराप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोरुडे बोलत होते. यावेळी दंततज्ञ डॉ.अंजली गोरे, डॉ.प्रशांत सुरकुटला आदींसह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ.अजंली गोरे म्हणाल्या कि, शिबिरातही चांगल्या शस्त्रक्रिया होतात हे गरजू रुग्णांना समजल्याने शिबीरांचे महत्व लक्षात आले, चांगला प्रतिसाद प्रत्येक शिबीरास लाभत असल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रस्तविकात मंडळाचे सौ.सुरेखा कोडम म्हणाले कि, महागाईच्या काळात आरोग्याकडे सर्वसामान्य नागरीक दुर्लक्ष करतात. त्यामुळे मोठा आजारा होऊन विविध संकटांना सामोरे जावे लागते. अशा गरजु रुणांसाठी गणेश जयंतीनिमित्त मंडळाच्यावतीने एक प्रयत्न म्हणून हे मोफत आरोग्य तपासणी शिबीरे घेण्यात येतात. जेणे करुन गरजु रुग्णांनाचे आरोग्य चांगले राहिल. असे त्यांनी सांगितले. 

या आरोग्य  शिबीरात 138 रुग्णांची तपासणी करुन मोफत औषधे वाटप करण्यात आले. डॉ.प्रशांत सुरकुटला यांनी आरोग्य तपासणी करुन योग्य ते मार्गदर्शन केले. तर  नेत्र तपासणी  शिबिरात 158 रुग्णांनी तपासणी होऊन 44 रुग्ण शस्त्रक्रियेसाठी निवडले. या शिबीरात आनंदत्रषी नेत्रालयाचे डॉ.किरण कवडे, डॉ.ओकांर वाघमारे, डॉ.संजय शिंदे यांनी रुग्णांनी नेत्र व मोतीबिंदू तपासणी केली. तसेच दंत तपासणी शिबीरात सौ. अजंली गोरे,डॉ.स्वप्निल आंधळे, डॉ.ऋषिकेश यांनी 66 रुणांची तपासणी करुन योग्य ते मार्गदर्शन केले. 

शिबीर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सर्व कार्यकर्ते व एकदंत महिला बचत गट सदस्यांनी परिश्रम घेतले. परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेखा कोडम यांनी केले, तर आभार श्रीकांत आडेप यांनी मानले. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News