पुणतांबा परिसरात,एम आय डी सि, चा प्रकल्प राबविण्याची मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कडे महेश कुलकर्णी याची मागणी


पुणतांबा परिसरात,एम आय डी सि, चा प्रकल्प राबविण्याची मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कडे महेश कुलकर्णी याची मागणी

शिर्डी,राजेंद्र दूनबळे

पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांनी नगरविकास मंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांची नगर येथे भेट घेऊन आगमन व वाढदिवसानिमित्त भगवीशाल  व गुच्छ देऊन पुणतांबा व परीसराच्या वतीने सत्कार केला यावेळी शहरप्रमुख कुलकर्णी यांनी नामदार  शिंदेसाहेबांना पुणतांबा व पुणतांबा परीसराची रोजगारानिमित्त  झालेली दईन अवस्था याचा पाढाच वाचला राहाता तालुक्यातील पुणतांबा गाव हे ऐतिहासिक दक्षिण काशी म्हणुन ओळखले जाणारे असुन येथे 1983 पासुन खाजगी चांगदेव शुगर मिल साखर कारखाना बंद झाल्यापासुन पुणतांबा व परीसरावर बेकारीची कुह्राड कोसळलेली असुन सुशिक्षित बेरोजगार संख्या दिवसेदिवस वाढत असुन कुठल्याही प्रकारचा रोजगार नसल्यामुळे व निसगाॅच्या लहरीपणाने दुष्काळी परीस्थीतीमुळे  शेतकरी बाधंव शेतमजुर हातमजुर सुशिक्षित बेरोजगार त्रस्त झाले असुन रोजगारासाठी स्थलातंर करणेची परिस्थिति निमाॅण झाली आहे 

गेल्या 30वषाॅपासुन पुणतांबा व पुणतांबा परीसरासाठी शासनाचा पयाॅयी उद्योग नसल्यामुळे सुशिक्षित युवक-युवती शिक्षण घेऊनही नोकरी व रोजगारासाठी दारोदार भटकंती करत आहे तरी आपण शासनाच्या ( सरकार )वतीने एखादा पयाॅयी उद्योग किंवा महाराष्ट्र शेती महामंडाळाच्या पडित 400ते 500 एकर जमीन खंडकर्याॅना वाटप करून शिल्लक असुन त्यावर एम आय डि सी सारखा प्रकल्प मंजूर करून राहाता तालुक्यातील व शेजारील इतर गाव हद्दीतील ग्रामीण सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती साठी वह हातमजुरांसाठी मंजूर होण्यास विनंती आहे तरी आपण नगरविकास मंत्री या नात्याने मुख्यमंत्री श्री उध्दवसाहेब ठाकरे पयाॅयवरण मंत्री नामदार अदित्यसाहेब ठाकरे व उद्दोगमंत्री नामदार श्री सुभाषजी देसाईसाहेब यांच्या मदतीने या प्रश्नात जातीने लक्ष घालुन पुणतांबा व पुणतांबा परीसरातील 40 ते 50 हजार लोकसंख्येला न्याय द्यावा हि कळकळीची नम्र विनंती असे लेखी निवेदन करून समक्ष चचॉ केली 

राहाता तालुक्यातील पुणतांबाफ गाव येथे पयाॅयी उद्योग निमाॅण करणेसाठी आग्रह धरला त्यावर नामदार शिंदे साहेबांनी सकारात्मक विचार करून लवकरच मुख्यमंत्री उध्दवसाहेबा बरोबर चचाॅ करून न्याय दिला जाईल असे सांगीतले याप्रसंगी नगरचे माजी महापौर भगवान फुलसौदंर जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर रावसाहेब खेवरे राजेद्र दळवी युवासेना जि प्रमुख विक्रम राठोड मा शहरप्रमुख  संभाजीराजे कदम नगरचे शहरप्रमुख दिलीपभाऊ सातपुते नगरसेवक गणेश कवडे  बाळासाहेब बोराटे गंधेसाहेब  राजाभाऊ बुरा पांडुरंग दातीर कोकेभाऊ संतोष थोरात सह मान्यवर उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News