महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पुणे विभागीय अध्यक्षपदी नितीन शिंदे यांची बिनविरोध निवड...राज्यस्तरीय नियुक्त्या जाहीर


महाराष्ट्र राज्य  पत्रकार संघाच्या पुणे विभागीय अध्यक्षपदी नितीन शिंदे यांची बिनविरोध निवड...राज्यस्तरीय नियुक्त्या जाहीर

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

पिंपरी (दि. 13 फेब्रुवारी 2021) पुणे- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या विभागस्तरीय  नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या .यामध्ये पुणे विभागीय अध्यक्षपदी नितीन शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. पुणे येथील संघाच्या कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत सर्वानुमते या नियुक्त करण्यात आल्या. यावेळी  महाराष्ट्र राज्य  पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, सरचिटणीस विश्वास आरोटे, ज्येष्ठ पत्रकार ॲड संजय माने उपस्थित होते .

        यामध्ये पुणे विभागीय अध्यक्षपदी नितीन शिंदे यांची निवड करण्यात आली तर विभागीय करण्यात आलेल्या नियुक्त्या या पुढील प्रमाणे आहेत. ॲड. संजय माने, सरचिटणीस - कायदा सल्लागार (पिंपरी चिंचवड),  राजेंद्र कोरके पाटील, उपाध्यक्ष (पंढरपूर), बाजीराव फराटे, कोषाध्यक्ष (कोल्हापूर), रोहित जाधव,संपर्क प्रमुख (सातारा), अतुल क्षीरसागर, संघटक, (पिंपरी चिंचवड), गोविंद वाकडे, (कार्याध्यक्ष), सतीश सावंत मार्गदर्शक सल्लागार (सांगोला सोलापूर), अल्ताफभाई पीरजादे उपाध्यक्ष, तसेच समीर पठाण यांची निवड करण्यात आली आहे.

          या बैठकीमध्ये संघाच्या पिंपरी- चिंचवड शहराध्यक्ष पदी पराग कुंकुलोळ यांची निवड करण्यात आली. पिंपरी चिंचवड कार्यकारणी पुढीलप्रमाणे आहे. अध्यक्ष पराग कुंकुलोळ,उपाध्यक्ष शिवप्रसाद डांगे,कार्याध्यक्ष जमीर सय्यद,सचिव निलेश जंगम, सह. सचिव औदुंबर पाडाळे, संपर्क प्रमुख महादेव मासाळ, संघटक विजय जगदाळे, खजिनदार शशिकांत जाधव,सह. संपर्क प्रमुख योगेश घाडगे,प्रसिद्धी प्रमुख प्रसाद वडघुले,सह. प्रसिद्धी प्रमुख सागर झगडे, कार्यकारिणी सदस्य म्हणून बेलाजी पात्रे, सुनील बेनके, बलभीम भोसले, संदीप सोनार, सदस्य, प्रमोद सस्ते यांची निवड करण्यात आली आहे.

     यावेळी मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्य  पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे म्हणाले कि, आपण कोणत्याही जाती धर्माचे नसून आपल्यासाठी पत्रकार हा एकच धर्म आहे. त्याच धर्माचे पालन करत आपले समाजप्रबोधन सुरु ठेवावे. प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे म्हणाले कि, सध्याची परिस्थिती पाहता वर्तमान पात्रांच्या किमतीमध्ये वाढ होणे गरजेचे आहे. जर नागरिक २ रुपये खर्च असलेला चहा १० रुपयांना घेत असेल तर आपण १०-१५ खर्चासाहित प्रिटिंग होणारे वृत्तपत्र वाचकांना २-५ रुपयांना का विकावे ? जर आपण प्रिटिंग खर्चासाहित वृत्तपत्र विक्री केले तर कोणत्याही वृत्तपत्राला फक्त जाहिरातींवर अवलंबून राहण्याहची गरज पडणार नाही आणि व्यवस्थापनावर ताण पडणार नाही.पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार -शिंदे

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पुणे विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नितीन शिंदे म्हणाले सध्या पत्रकारांचे प्रश्नही ही जटिल झाले आहेत. कोरोना आणि लॉकडाऊन नंतर या प्रश्नांनी अत्यंत व्यापक स्वरूप घेतले आहे. कोरोनाकाळात अनेकांच्या  नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. याशिवाय  आरोग्य विषयक  समस्या गुंतागुंतीच्या होत आहेत त्यामुळे या प्रश्नांना पुढाकार घेऊन सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करण्यात येतील असेही शिंदे यांनी सांगितले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News