पळशीत महा आवास योजना अभियान मेळावा संपन्न


पळशीत महा आवास योजना अभियान मेळावा संपन्न

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

बारामती तालुक्यातील पळशी याठिकाणी महा आवास अभियान योजना मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते हे होते. गोरगरीब कुटुंबातील व्यक्तींसाठी शासनाच्या घरकुलसंदर्भात अनेक योजना असून घरकुलाचा लाभ गरजू लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन देवकाते यांनी पळशी येथे केले. 

यावेळी प्रधानमंत्री आवास योजना, यशवंत घरकुल योजना, रमाई घरकुल योजना, शबरी योजना या विविध योजनांची माहिती सरपंच चोरमले यांनी दिली. तसेच राहुल भापकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

       याप्रसंगी नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुरलीधर ठोंबरे, मनोहर भापकर, अंगणवाडी सुपरवायझर गुणाबाई ठोंबरे, सरपंच बाबासाहेब चोरमले, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण कोळेकर, संदीप कोळेकर, सोपान गुलदगड, हिरामण गडदरे, मल्हारी हाके, ग्रामसेविका दिपाली हिरवे, घरकुल लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच चोरमले यांनी तर आभार भाऊसाहेब गुलदगड सर यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News