ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याची अत्यंत गरज आहे.


ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याची अत्यंत गरज आहे.

 शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण:

कोरोनाथ साथीमुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्थेचे परिणाम आता ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. सरकारने शहराप्रमाणेच ग्रामीण भागाकडे लक्ष देण्याची गरज आहे असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड शिवाजीराव काकडे यांनी आज गोळेगाव येथे केले. जिल्हा परिषद योजनेतून सौ.हर्षदाताई काकडे यांच्या विशेष प्रयत्नातून झालेल्या गोळेगाव ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन आज करण्यात आले यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री क्षेत्र काशी केदारेश्वरदेवस्थानचे मठाधिपती ह.भ.प. बाबागिरी महाराज होते. यावेळी जनशक्तीचे उपाध्यक्ष संजय आंधळे, सरपंच विजय साळवे, उपसरपंच मुक्ताताई आंधळे, भाऊसाहेब कणसे, शेषराव वंजारी, जालिंदर आंधळे, रोहिदास पातकळ, देवराव दारकुंडे, नरेश वडते, रवि वडते, किसन राठोड, गीते सर, गोरक्ष खेडकर, भागवत डमाळे, बप्पासाहेब बर्डे, शिवाजी कणसे, उद्धव बर्डे, गोरक्ष चेमटे, भुजंगराव चिमटे आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी अॅड.काकडे म्हणाले की, कोविडमुळे खेड्यापाड्यातील शेतकरी संभ्रमात सापडला आहे. त्यांच्या हाताला काम राहिले नाही. दूध धंदा व शेती पूरक धंदे देखील वर्षभर ठप्प झाले होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यासाठी छोटे-छोटे उद्योग आता शासनाने शेतकऱ्यांसाठी गावोगावी राबवले पाहिजेत. ग्रामीण भागातील मुलांनी येथून पुढे नोकरीच्या मागे न धावता व्यवसायाभिमुख शिक्षणाकडे वळण्याची गरज आहे. तरच पुढे त्याच्यावर चांगले दिवस येऊ शकतात असेही ते बोलताना म्हणाले.

जि.प.सदस्या सौ. काकडे ताई म्हणाल्या की, गावच्या विकासासाठी एकी फार महत्वाची आहे. त्यासाठी पक्षीय जोडे बाजूला ठेवून गावच्या विकासावरच सर्वांनी भर द्यावा. गोळेगाव येथील पाझर तलावाच्या भिंत दुरुस्त करून तलावावर नवीन काँक्रेट बंधाऱ्यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्याचे काम झाले तर येथील शेती कायमस्वरूपी बागायती होऊ शकते. तसेच प्रधानमंत्री ग्रामसडक रस्त्याला उपरस्ता करून तो सानपवस्ती वरून श्री क्षेत्र काशी केदारेश्वर देवस्थान पर्यंत गेला तर देवस्थान आणखी प्रकाश झोतात येऊन भक्तांना जाण्या-येण्याची सोय होणार आहे. त्यासाठी देखील मी प्रयत्नशील आहे. कोविडमुळे विकास कामाला निधी नव्हता. परंतु मी गटासाठी खूप निधी आणण्याचा प्रयत्न करत असते असे त्या बोलताना म्हणाल्या. ह.भ.प. बाबागिरी महाराज आपल्या अध्यक्षिय भाषणात म्हणाले की, गटातील कामे व्हावीत यासाठी सौ.काकडे ताई सतत प्रयत्नशील असतात. सरपंचांनी असेच चांगले काम गावासाठी करावे. हे पद पहिल्यासारखे शोभेचे नसून सरपंचांनी गावच्या विकासासाठी आपल्या पदाचा वापर केला पाहिजे. असेही बाबागिरी महाराज म्हणाले. यावेळी ग्रा.प.सदस्य, गावकरी परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News