कता फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य नाना डोंगरे यांचा सत्कार


कता फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने  नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य नाना डोंगरे यांचा सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) निमगाव वाघा ग्रामपंचायत निवडणुकीत पै. नाना डोंगरे मताधिक्याने ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्याबद्दल एकता फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने त्यांचा फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल फलके यांनी सत्कार केला. यावेळी अरुण अंधारे, रामदास पवार, जावेद शेख, संदिप डोंगरे, मुश्ताक शेख, गौरव काळे, देवीदास निकम, अक्षय जाधव आदी उपस्थित होते.

अतुल फलके म्हणाले की, सामाजिक कार्यात योगदान देऊन नाना डोंगरे यांनी गावाचे नांव उंचावले आहे. त्यांची ग्रामपंचायत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल विकासात्मक कार्याला गती मिळणार आहे. ग्रामस्थांनी सर्वसामान्य व्यक्तीला निवडून काम करण्याची संधी दिली असल्याचे सांगितले. पै. नाना डोंगरे यांनी ग्रामस्थांनी सामाजिक कार्याची दखल घेत ग्रामपंचायतमध्ये सेवा करण्याची संधी दिली असून, या विश्‍वासाला कधीही तडा जाऊ न देणार नाही. अविरतपणे गावाच्या विकासासाठी कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News