शिवाजी महाराज यांचे अतुलनीय कार्यातून लोकप्रतिनिधींना प्रेरणा देण्यासाठी शिवजयंती दिनी अलेक्झांडर सवाई शिवाजी सत्यबोधी सुर्यनाम्याचे आयोजन


शिवाजी महाराज यांचे अतुलनीय कार्यातून लोकप्रतिनिधींना प्रेरणा देण्यासाठी  शिवजयंती दिनी अलेक्झांडर सवाई शिवाजी सत्यबोधी सुर्यनाम्याचे आयोजन

राज्यकार्त्यांनी शिवाजी महाराजांचे गुण अंगीकारुन जनतेचे आश्रू पुसण्याची गरज -अ‍ॅड. गवळी 

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - रयतेचे आश्रू पुसणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अतुलनीय कार्य व विचारांपासून राजकीय मंडळी व लोकप्रतिनिधींना प्रेरणा देण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी शुक्रवार दि.19 फेब्रुवारी रोजी अलेक्झांडर सवाई शिवाजी सत्यबोधी सुर्यनामा केला जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

जग जिंकण्याची आशा बाळगलेला व निम्म्यापेक्षा जग काबिज करणारा अलेक्झांडरपेक्षा शिवाजी महाराज त्यांच्या गुणांमुळे सर्वांना श्रेष्ठ वाटतात. दोन्ही मध्ये तुफानी ऊर्जा ही साम्य गोष्ट होती. मात्र शिवाजी महाराजांमध्ये उन्नतचेतना व लोकभज्ञाक गुण असल्याने ते सर्वसामान्यांना श्रेष्ठ वाटतात. अलेक्झांडरने फक्त राज्य काबीज करण्याच्या हेतूने सत्ता उपभोगली. मात्र शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण करुन त्यांचे आश्रू पुसण्याचे कार्य केले. हे गुण आजच्या नेते मंडळी व लोकप्रतिनिधींना दिशादर्शक आहे. अनेक पुढारी व मंत्री भ्रष्ट मार्गाने संपत्ती कमवतात व पैश्याच्या जोरावर मत खरेदी करुन पुन्हा निवडून येतात. अशा लोकप्रतिनिधींकडून जनतेच्या हिताची अपेक्षा करणे देखील चूकीचे आहे. ते फक्त संपत्ती कमविण्यात गुंतले असून, शिवाजी महाराजांच्या विचारापासून ते लांब आहेत. आजच्या नेते मंडळी, मंत्री व राज्यकार्त्यांनी शिवाजी महाराजांचे गुण अंगीकारुन जनतेचे आश्रू पुसण्याची गरज असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

केंद्रात भाजप सरकाचे बहुमत असून देखील त्यांना शेतकरी, घरकुल वंचित व युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न सोडविता आलेला नाही. मंत्री महोदय नगरमध्ये येऊन चित्रपट सृष्टी निर्माण करण्याचे वक्तव्य करतात. मात्र येथील बेघर नागरिकांना हक्काचा निवारा नाही, चांगले रस्ते नाही, अनेक भागात पिण्यासाठी पाणी नाही या सामाजिक विषयावर बोलण्यास कुणी तयार नाही. ज्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्‍न सोडविण्याची तळमळ व आस्था नसेल अशा राज्यकर्त्यांना शिवाजी महाराजांचा नांव घेण्याचा देखील अधिकार नसल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. अलेक्झांडर सवाई शिवाजी सत्यबोधी सुर्यनामा करण्यासाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, अर्शद शेख, विठ्ठल सुरम, अशोक भोसले, शाहीर कान्हू सुंबे, बाबा आरगडे आदी प्रयत्नशील आहेत.   

जाहिरात
Search
विडिओ
Recent News