मिरवडी येथील माती व वाळू तस्कर जोमात महसूल विभाग कोमात !


मिरवडी येथील माती व वाळू तस्कर जोमात महसूल विभाग कोमात !

 दौंड प्रतिनिधि : ता.१२ फेब्रु

दौंड तालुक्याच्या पश्चिमेकडील अनेक गावांत बेकायदा माती उतखनन सुरू असून सरकारी नियम धाब्यावर बसवून शेकडो टन माती उपसली जात आहे. मिरवडी ता.दौंड येथील शेतक-यांच्या शेतीमधून माती उत्खननाचा परवाना न काढता बेकायदेशीर माती उपसण्याचा सपाटा मातीतस्करांनी लावलेला आहे. डंपर व ट्रकच्या सहाय्याने शेतातील मातीची दिवसाकाठी शेकडो ट्रेलर मातीची लूट सुरू असून, याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या माती उपशातील आथिर्क गणितांमुळे सराकरचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात सुपीक मातीचे सर्वाधिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.नगदी पिके व रोपांसाठी, शेतीसाठी, ग्रीन हाऊस,नर्सरीसाठी उपयुक्त असल्याने व सर्वाधिक वीट भट्यावर ही माती पुरवली जाते यामुऴे मोठ्या प्रमाणात या मातीला मागणी आहे. सध्या या ठीकाणाची माती ही ग्रीन हाऊसकरिता लोणी,उरुळी,चौफुला परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जाते.सबधित प्रत्यक्षात त्या गट नंबरमध्ये कितीतरी अधिक पटीने मातीचा उपसा करुन शासनाचा शेकडो ब्रासचा महसूल बुडविला जात आहे. शेतकऱ्यांकडून प्रती डंपर कवडीमोल रुपये याप्रमाणे किंमतीमध्ये या मातीची खरेदी केली जाते.                 मिरवडी गावातील नागरिकानी अनेक वेळा महसूल विभागाला तक्रारी करुन सुद्धा कारवाई मात्र शून्य.अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची विल्हेवाट लागली आहे.राजकीय पुढार्याचा वरदहस्त असल्याकारणाने हे व्हाइट क्वालर तस्कर अगदी ऐटित वावरत असतात.सध्या ही वाहतूक उघड्या हौद्यामधून सुरू आहे.वाहनांची गावातून सतत वाहतूक सुरू असल्याने उडणाऱ्या धुरळ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.अवजड वाहतुकीमुळे गावातील, तसेच विभागातील रस्त्यांची पूर्णत: वाताहत झाली आहे.जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र देशमुख यानी स्वता लक्ष घालून मिरवडी येथील या माती तस्कर विरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकानी केली आहे.

            मिरवडी गावाचे तलाठी पी.केंद्रे याना संपर्क केला असता त्यानी असे सांगितले की,मी चार्ज स्विकारन्या अगोदर येथे १४ लाख रुपयांची कारवाई करण्यात आली होती.मिरवडी येथे झालेल्या माती उत्खनाबाबत कोतवाल याना पाठवून पंचनामा करण्याचे आदेश देतो.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News