भीम आर्मीच्या महाराष्ट्र अध्यक्ष पदी प्रफुल्ल शेंडे तर वरिष्ठ उपाध्यक्ष पदी उत्तरेश्वर कांबळे यांची नियुक्ती..


भीम आर्मीच्या महाराष्ट्र अध्यक्ष  पदी प्रफुल्ल शेंडे तर वरिष्ठ उपाध्यक्ष पदी उत्तरेश्वर कांबळे यांची नियुक्ती..

शिर्डी,राजेंद्र दूनबळे

दि.10 फेब्रुवारी रोजी महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथे मराठवाडा विभागिय व महाराष्ट्र राज्य ,कोअर कमेटीच्या वतीने आयोजित केलेल्या महत्त्वाच्या मिटींग मधे भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी नागपुरचे प्रफुल्ल शेंडे तर वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून  करमाळ्याचे उत्तरेश्वर कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष विनयरतनसिंग यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा महाराष्ट्र राज्य प्रभारी दत्तुजी मेढे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.  संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अॅड चंद्रशेखर आझाद रावण यांचे खंदे समर्थक आणी निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.महाराष्ट्र यांचा दांडगा जनसंपर्क आहे. 

भीम आर्मीच्या महिला आघाडी, कामगार आघाडी,वाहतुक सेल ,अशा विंग तयार करण्यात येणार असुन इच्छूक कार्यकर्त्यांनी भीम आर्मीच्या स्थानिक तालुका,व जिल्हा प्रमुखांना संपर्क साधावा असे आवाहन प्रफुल्ल  शेंडे यांनी केले आहे.

यावेळी गुजरात प्रभारी अशोकभाऊ कांबळे, कोअर कमेटी प्रमुख  राजू झनके, वरिष्ठ उपाध्यक्ष रणधीर आल्हाट, रमेश बालेश, बलराज भाई दाभाडे, सुनिल थोरात, राहूल वाघ  सचिव बाळुभाऊ वाघमारे,मुख्य संघटक दिपक भालेराव, कार्याध्यक्ष सुनिल गायकवाड, मनिष भाई साठे, प.महाराष्ट्र प्रमुख जावेद नायकवडी व सर्व जिल्हा प्रमुख कार्यकर्ते,व,पत्रकार राजेंद्र दूनबळे, यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या वअहमदनगर जिल्ह्यातील अनेक भिमसैनिकांनी भीम आर्मीत जाहीर प्रवेश केला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News