सुरेश बागल दौंड प्रतिनिधी:
कानगांव (ता .दौंड) ग्रामपंचायतीच्या पंधरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भैरवनाथ जनसेवा पॅनेलला नऊ जागा भैरवनाथ महाविकास आघाडी पॅनेलला तीन जागा गणेश कृपा पॅनेलला दोन जागा भैरवनाथ जोगेश्वरी पॅनलला एक जागा मिळाली होती सरपंच पद एस सी प्रवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे भैरवनाथ जनसेवा पॅनेलचे राहुल गणपत चाबुकरवार यांची बिनविरोध निवड झाली तर उपसरपंच पदासाठी निवडणुक घेण्यात आली भैरवनाथ जनसेवा पॅनेलच्या विजयी उमेदवार वैशाली संतोष शेलार आणी भैरवनाथ जोगेश्वरी पॅनेलच्या विजयी उमेदवार सिमा सुरेश कोऱ्हाळे यांचे दोन फॉर्म होते गुप्तपध्दतीने मतदान घेण्यात आले यावेळी भैरवनाथ जनसेवा पॅनेलच्या उमेदवार वैशाली संतोष शेलार यांना बारा मते पडली तर भैरवनाथ जोगेश्वरी पॅनेलच्या उमेदवार सिमा सुरेश कोऱ्हाळे यांना तीन मते मिळाली.
कानगांवच्या सरपंचपदी राहुल गणपत चाबुकस्वार यांची तर उपसरपंच पदी वैशाली संतोष शेलार यांची निवड झाली अशी माहीती निवडणुक निर्णय अधिकारी भोंडवे साहेब यांनी दिली. यावेळी तलाठी व्यवहारे साहेब ग्रामविकास आधिकारी वाबळे भाऊसाहेब पोलीस अधिकारी चव्हाण साहेब पोलीस पाटील ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.