दुरगावच्या सरपंचपदी सौ संजीवनी जायभाय यांची तर सौ समीना शेख यांची उपसरपंचपदी निवड


दुरगावच्या सरपंचपदी सौ संजीवनी जायभाय यांची तर सौ समीना शेख यांची उपसरपंचपदी निवड

कर्जत प्रतिनिधी मोतीराम शिंदे:

 दि.९रोजी कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील ग्रामपंचायत सरपंचपदाची निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली ही निवड प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रय सुद्रीक व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सदाशिव आटोळे यांनी काम पाहिले. यावेळी सरपंचपदासाठी संजीवनी अशोक जायभाय आणि महेश जायभाय यांचे तर उपसरपंच पदासाठी समीना शेख आणि विजय क्षीरसागर यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. यावेळी गुप्त मतदान घेऊन संजीवनी जायभाय आणि समीना शेख यांना सहा सहा तर महेश जायभाय आणि विजय क्षीरसागर यांना पाच पाच मते मिळाली.यावेळी संजीवनी जायभाय यांना सरपंच तर समीना शेख यांची उपसरपंच म्हणून घोषित करण्यात आले. या प्रक्रियेत ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ शिंदे, मुक्ताबाई जायभाय, हौसाबाई धांडे, संगीता वाबळे, रवींद्र भगत, सुगंधा आढाव, राजेंद्र निंबाळकर आदी उपस्थित होते. यावेळी सफौ.महादेव गाडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सौ संजीवनी जायभाय या आधी विद्यमान सरपंच होत्या. सौ संजीवनी जायभाय या राष्ट्रवादीचे नेते अशोक जायभाय यांच्या पत्नी असुन मागील पाच वर्षांच्या कालावधीत अशोक जायभाय यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या माध्यमातून दुरगावात दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत एक कोटी दहा लाख रुपयांची कामे केली आहेत. तसेच १४ वित्त आयोगाच्या माध्यमातून सत्तर लाख रुपयांची कामे पूर्ण करण्यात आली आहे. तसेच दुर्योधन पर्यटन योजनेला एक कोटी वीस लाख रुपये मंजूर करून घेतले आहेत. शामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेत ५४० कुटुंबांना गॅसचे वाटप करण्यात आले आहेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, व शबरी आवास योजनेंतर्गत २२० घरकुलांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच स्वच्छ भारत योजनेअंतर्गत हागणदारी मुक्त साठी जवळपास ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्हा परिषद सेस मधून रस्त्यासाठी २० लाखाचा निधी आणला आहे. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत ८ कीलो मीटर नदीचे खोलीकरण साठी ८० लाख रुपयांचा निधी मिळवला आहे. जुन्या बंधारा रिपेरिंग साठी २० लाख रुपयांचा निधी तसेच नवीन ४ बंधारे बांधण्यासाठी ७० लाखाचा निधी उपलब्ध करून घेतला आहे. तसेच ४५० हेक्टर क्षेत्राची बांध बांदिस्ती करण्यात आली. मागील वर्षी चक्री वादळात जिल्हा परिषद शाळेचे नुकसान झाले होते त्या साठी नविन ४ खोल्या मंजूर करून त्यासाठी ३३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला आहे इत्यादी विकास कामे मागच्या काळात पुर्ण करण्यात आली होती. त्यामुळे दुरगावच्या जनतेने आम्हाला पुन्हा सत्तेवर बसवले असुन ही निवडणूक धनशक्ती विरूद्ध जनशक्ती होती असे अशोक जायभाय यांनी सांगितले. 

     यावेळी ही निवडणूक सदगुरु ग्रामविकास पॅनलचे प्रमुख सुरेश जायभाय, व राष्ट्रवादीचे नेते अशोक जायभाय, तसेच पप्पू शेख, यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली होती. या निवडणुकीच्या वेळी बाळासाहेब भगत, अजिनाथ जायभाय, देवराम केंदळे, सुरेश वाबळे, धनंजय जायभाय, दत्तात्रय जायभाय, शिवाजी जायभाय, दादासाहेब गोरे, अप्पासाहेब सातव, अशोक कुलथे, सूर्यभान जायभाय, अल्लाउद्दीन शेख, दस्तगिर शेख, नामदेव जायभाय, सुभाष धांडे, अण्णासाहेब निंबाळकर, अप्पासाहेब निंबाळकर, अक्षय पाटील, लाला केंदळे, अनिल सोनवणे, काकासाहेब निंबाळकर, जनार्धन निंबाळकर, मंगेश पाटील, गोरख निंबाळकर, गणेश निंबाळकर आदी.उपस्थित होते.

- आगामी पाच वर्षांच्या कालावधीत दुर्योधन पर्यटन विकासा साठी, प्राथमिक शिक्षणासाठी तसेच वाड्यावस्त्यांवरील रस्त्यासाठी काम करणार असून गावाकडे येणारे सर्व मुख्य रस्ते यांची कामे करून  शेतीला पुरक असणाऱ्या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. - सौ. संजीवनी जायभाय, सरपंच दुरगाव 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News