पत्रकारास मारहाण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीवर गंभीर गुन्हा दाखल न झाल्यास पत्रकार संघ राज्य भर तीव्र आंदोलन करणार -बरकत अली शेख


पत्रकारास मारहाण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीवर गंभीर गुन्हा दाखल न झाल्यास पत्रकार संघ राज्य भर  तीव्र आंदोलन करणार -बरकत अली शेख

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे चांदवड तालुका अध्यक्ष सुखदेव सोमा केदारे वय 65 राहणार मु. पो. तळेगाव रोही तालुका चांदवड यांनी साप्ताहिक राजनिति समाचार या वृत्तपत्रात तळेगाव रोही गावातील पाझर तलावातील पाणी व आकडे टाकून वीज चोरी होत असल्या प्रकरणी बातमी प्रसिद्ध केल्याचा रोष धरून गावातील गुंड प्रवृत्तक राजू पांडुरंग बडे यांनी सुखदेव केदारे यांच्या वयाची जाणीव न ठेवता आमच्या विरुद्ध बातमी छापतो का, तुझी ही मजल, महाडा माजला का, असे जातिवाचक शिवीगाळ करून त्यांना जबर मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सुखदेव सोमा केदारे यांनी दिनांक 03-0 2- 20 21 रोजी चांदवड पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली असून या तक्रारीच्या प्रति माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब नाशिक ग्रामीण यांना दिले आहे. या तक्रारीवरून चांदवड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सुकदेव सोमा केदारे यांच्या तक्रारीनुसार फिर्याद न घेता सामने वाला राजू पांडुरंग बडे याच्याविरुद्ध एन.सी. आर. चा गुन्हा नोंदविला सबब फिर्याद मागे घ्यावी याकरिता राजू बडे हा सुखदेव सोमा केदारे यांना धमकावून जीवे मारण्याची धमकी देत आहे. सबब प्रकरणी पोलीस उपअधीक्षक उपविभाग मनमाड स्वतः चौकशी करून राजू बडे या गुंडावर पत्रकार सुखदेव सोमा केदारे यांना मारहाण व जाती वाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीकरिता पत्रकार संघाचे नासिक जिल्हा सचिव वहाब खान मेहबूब खान यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपअधीक्षक श्री. साळवे, उपविभाग मनमाड यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले. सदरील निवेदन कार्यालयातील वाचक फौजदार श्री जगताप यांनी स्वीकारले तसेच या निवेदनाची प्रत चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. बारवकर यांना देण्यात आली. सदरील निवेदन देताना पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष फिरोज भाई पठाण, पत्रकार संघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मान के. शेख नासिक जिल्हा कार्याध्यक्ष मनसुर भाई पठाण, मालेगाव शहराध्यक्ष इलियास छोटे मिया, येवला शहर अध्यक्ष सूर्यकांत गोसावी, राजनिति समाचार वृत्तपत्राचे प्रतिनिधी राजेंद्र केदारे, राहुल गायकवाड, बाळासाहेब केदारे, खंडू पवार, आदि व इतर पत्रकारांच्या उपस्थित निवेदन देण्यात आले याप्रकरणी तातडीने चौकशी व कार्यवाही न झाल्यास पत्रकार संघाच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना दिला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News