भिगवण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तानाजी वायसे तर उपसरपंचपदी शीतल शिंदे बिनविरोध..


भिगवण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तानाजी वायसे तर उपसरपंचपदी शीतल शिंदे बिनविरोध..

भिगवण(प्रतिनिधी): नानासाहेब मारकड 

भिगवण गावच्या सरपंचपदी तानाजी अनिल वायसे यांची तर उपसरपंचपदी शीतल बाबासाहेब शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. 

          निवडणूक निर्णय अधिकारी सतिश महानवर यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.सरपंचपद ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने अनेकांनी पक्षश्रेष्ठींकडे सरपंचपदासाठी आग्रह धरला होता मात्र जातीय समीकरण त्याचप्रमाणे भौगोलिक परिस्थिती विचार करता भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत वायसे व शिंदे यांच्या नावाला पसंती दिली. 

     नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत  सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचा पराभव करत  पक्षविरहीत स्व. रमेशबापू जाधव प्रेरीत श्रीनाथ पॅनेलने जोरदार मुसंडी मारत १७ पैकी १६ जागांवर यश मिळविले यामुळे  पाच वर्षांनंतर श्रीनाथ पॅनेलकडे सत्तेचा सारीपाट आला आहे. पाच वर्षांपूर्वी वीस वर्षांची सत्ता हस्तगत करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने भिगवण ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले होते.

    श्रीनाथ पॅनेलचे प्रमुख संजय देहाडे,अशोक शिंदे,अजित क्षीरसागर,पराग जाधव,संजय रायसोनी,तुषार क्षीरसागर,हरिश्चंद्र पांढरे,गुराप्पा पवार  यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तर भिगवण गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटीबद्ध राहणार असल्याचे नूतन सरपंच तानाजी वायसे यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News