पाटस गावच्या सरपंचपदी अवंतिका शितोळे तर उपसरपंचपदी छगन म्हस्के बिनविरोध


पाटस गावच्या सरपंचपदी अवंतिका शितोळे तर उपसरपंचपदी छगन म्हस्के बिनविरोध

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी:

पाटस : दौंड तालुक्यातील पाटस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले असून सरपंचपदी अवंतिका अभिजित शितोळे तर उपसरपंचपदी छगन पांडुरंग म्हस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी अजित नाईक यांनी पाटस येथे केली.

      मौजे पाटस येथील ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवार दि. ९ रोजी पार पडलेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नागेश्वर पॅनेलच्या वतीने अवंतिका शितोळे यांनी सरपंच पदासाठी तर छगन म्हस्के यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केले. तर विरोधात भाजप पुरस्कृत नागनाथ जनसेवा पॅनलच्या वतीने तृप्ती भंडलकर यांनी सरपंच पदासाठी व माणिक चोरमले यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केले होते. 

      मात्र अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत भाजप पुरस्कृत म्हणजेच आ. राहुल कुल गटाच्या दोन्ही उमेदवारांनी माघार घेत असल्याचे सांगितले. त्यामुळे साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत म्हणजेच रमेश (अप्पा) थोरात गटाच्या दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अजित नाईक यांनी अवंतिका शितोळे यांची सरपंचपदी व छगन म्हस्के यांची उपसरपंचपदी नियुक्ती करण्यात आल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले व तसे निवडीचे पत्रक सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व उपस्थित नागरिकांसमोर दिले. 

      दरम्यान, नवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत डीजेच्या तालावर एकच जल्लोष केला व गावाच्या मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News